"सोलापूर लोकसभा उमेदवार म्हणून प्रणिती शिंदे या जनसंपर्का मध्ये अग्रेसर"

 



पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघातील 2024 ची मध्यवर्ती निवडणूक या जाहीर झालेल्या असून सध्या आय काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती ताई शिंदे यांचे नाव सर्वात जास्त चर्चिले जात असून या सोलापूर मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार म्हणून या लोकसभा निवडणुकीसाठी त्या इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.
     आय काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती ताई शिंदे या लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक असल्यामुळे त्यांनी संपूर्ण मतदारसंघातील गाव भेटींना प्रारंभ केलेला आहे. या त्यांच्या गाव भेटीला संपूर्ण मतदारसंघांमधून चांगला प्रतिसाद मिळून असल्याचे दिसून येत आहे. आज कोणत्याही पक्षाचा उमेदवार हा निश्चित जाहीर झालेला नसून देखील उमेदवारी आपल्यालाच मिळेल या खात्रीने आमदार प्रणिती ताई शिंदे या प्रचार दौऱ्यामध्ये गाव भेटीच्या माध्यमातून ते मतदार संघातील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यामध्ये त्याचप्रमाणे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे.
     भाजपा या पक्षाचा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नसल्यामुळे कोणाला उमेदवारी मिळेल. या संभ्रमा अवस्थेमध्ये इच्छुक भाजपा उमेदवार असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे सोलापुरातील जनता ही स्थानिक लोकप्रतिनिधीला उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही असल्याची दिसून येते. त्यामुळे भाजपाचे अमर साबळे, राम सातपुते आदी मान्यवर नेतेमंडळी ही स्थानिक नसल्यामुळे या उमेदवारीच्या स्पर्धेतून बाहेर पडतात की काय ? अशी अवस्था सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये निर्माण झालेली आहे. आणि उमेदवार म्हणून आय काँग्रेसच्या आमदार प्रणिती ताई शिंदे या स्थानिक उमेदवार म्हणून जनतेला सामोरे जात आहे. जनतेमधून देखील त्यांच्या आजपर्यंतच्या आमदारकीच्या कारकिर्दी मधील विकास कामे पाहून सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदार हे प्रणिती ताई शिंदे यांच्याकडे भावी खासदार म्हणून पहात आहे.
     आमदार प्रणिती ताई शिंदे यांचे वडील माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची दिल्ली या ठिकाणी चांगलीच बैठक असल्यामुळे उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.  प्रणिती ताई शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामधून गाव खेड्यामधून त्यांनी आपला अघोषित प्रचार दौरा सुरू केलेला असून या दौऱ्यामध्ये त्या अग्रेसर असल्याचेच आज दिसून येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....