" मोहिते पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने भाजपा पराभूत होण्याची शक्यता "
मोहिते पाटील परिवाराची समजूत कशी काढणार? पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकत्याच लोकसभा निवडणुकीची उमेदवारी ही सर्वत्र जाहीर होत असताना महाराष्ट्रातील काही भाजपा खासदारांचे उमेदवारी जाहीर झालेली . या लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला पुनश्च भाजपा उमेदवारी मिळवत सध्या भाजपाचे खासदार पुन्हा एकदा गुडघ्याला बाशिंग बांधून खासदार होण्यासाठी तयार झाले आहेत. परंतु आपल्या मतदारसंघांमध्ये कोणती विकास कामे केली, की नुसतीच आश्वासने देऊन पाच वर्ष खासदारकीचे काढले. याचा लेखाजोखा आता या भाजपा खासदारांना जनतेसमोर द्यावा लागणार आहे. नुकतीच माढा तालुक्याचे सध्याचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना माढा तालुक्यामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले त्यांच्या गाडीसमोर गाजरे ओतून त्यांच्या "गाजर दाखवू" आश्वासनाला गाजरानेच त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. विकास कामाची खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केल्याची तक्रार या माढा तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांच्या कडून होत असल्याचे दिसून येत आहे. ज्या अकलूजच्या मोहिते पाटील गटाच्या जोरावर माढा तालुक्याची लोकसभेची खासदारकीची जागा ही एक लाख दहा हजार च्या मताधिक्याने भाजपाला निवडून दिले. त्या मोहिते पाटील गटांना डावलून पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदारकीच्या रिंगणामध्ये उतरले आहे. काही भाजपाच्या नेतेमंडळीला आपलेसे करून पुन्हा एकदा खासदारकीची उमेदवारीची माळ आपल्या गळ्यामध्ये पाडून घेऊन गत लोकसभे प्रमाणे यंदाही मोहिते पाटील आपल्याला सहकार्य करतील.मोहिते पाटील परिवाराची समजूत वरीष्ठ नेते मंडळींच्या माध्यमातून काढण्याचे नियोजन केले जाईल. परंतु अकलूज येथील मोहिते पाटील गटाचे धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभेच्या निवडणुकीसाठी माढा लोकसभा मतदारसंघातून षड्डू ठोकून उभे ठाकण्याच्या विचारात आहेत.मोहितेपाटील यांना उमेदवारी न दिल्याने मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते त्यांनां भाजपा विरोधी बंड करण्यास प्रवृत्त करीत आहेत.मोहिते पाटील यांच्या मुळे गेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपा उमेदवाराला एक लाखा हून अधिक मताधिक्य मिळाले होते.मोहितेपाटील यांनी मनात आणले तरच भाजपाचा लोकसभेचा उमेदवार निवडून येऊ शकतो. हे गत पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी दाखवून दिलेले आहे. मतदार संघातील विविध विकास कामे करण्याचा अनुभव मोहिते पाटील गटाकडे असल्याने तसेच जे आश्वासन ते देतात. ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करतात. हे या सोलापूर जिल्ह्यातील सर्व जनतेला माहित आहे. म्हणूनच धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारी मागत होते आता मोहिते पाटील गटाला टाळून भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे . मोहिते पाटील गटाची भाजपा कशी समजूत काढते हे जाणून घ्यावे लागेल. मोहितेपाटील गटाकडे उमेदवारी बाबतीत भाजपाने दुर्लक्ष केल्यामुळे भाजपाला या माढा लोकसभा मतदारसंघांमधून पराभवाला सामोरे जावे लागेल. अशी चर्चा सध्या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये चर्चिली जात आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा