राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) ची राज्यात मोर्चेबांधणी जोरदार सुरू...
पंढरपूर ( प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या गटाची मोर्चेबांधणी संपूर्ण राज्यभरामध्ये सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात सुरुवात केलेली असून आज पंढरपूर येथील यशवंत पतसंस्था च्या सभागृहामध्ये आयोजित पक्षाच्या बैठकीमध्ये जागतिक सदस्य चेअरमन कल्याणराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांच्या वतीने विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. या पदाधिकाऱ्यांमध्ये कार्याध्यक्ष सुनील भीमराव जाधव सह .कार्य अध्यक्ष रशीद अकबर शेख शहर उपाध्यक्ष ओम कदम उपाध्यक्ष संजय महादेव मामाने खजिनदार संदीप किसनराव रणवरे संघटक संजय वामन सातपुते, सचिन माधव सोळंके, सदस्य बाळासाहेब दिगंबर देवमारे, सदस्य राजू सदाशिव चव्हाण, यांच्या निवडी करण्यात आल्या असून अजित पवार गटाचे हात बळकट करण्याचे सांगण्यात आले. चेअरमन कल्याणराव काळे यांनी पदाधिकाऱ्यांच्या निवडीची माहिती देऊन माढा लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
यामध्ये खासदार निंबाळकर यांच्या निधी वाटपावरून त्यांनी खदखद व्यक्त केली असून कार्य करण्याच्या हट्टा पोटी वेगळा निर्णय घेऊ असा इशारा दिला आहे .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा