" मोहिते नी तुतारी हाती घेतल्यास दुधारी चे बळ लाभणार "
पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवाराचे नाव जाहीर झाल्यापासून माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये मोहिते गटामध्ये नाराजीचा सूर तीव्रपणे उमटत असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.
भाजपाचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्याशी गेली तीन वर्ष पासून मोहिते पाटील व निंबाळकर यांच्यात सुसंवाद राहिलेला नाही. त्याचप्रमाणे विविध विकास कामांमध्ये मोहिते यांना सामील न करून घेतल्यामुळे नाराजी वाढतेच गेली. त्याचा परिणाम म्हणून मोहिते पाटील गटातील धैर्यशील पाटील यांनी भाजपाकडे माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून मागणी केली परंतु त्यांना उमेदवारी नाकारण्यात येऊन पुन्हा एकदा खासदार रणजीतच्या नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे या माढा लोकसभा मतदार संघामध्ये मोहिते पाटील गटाला मानणारा प्रचंड मोठा वर्ग असून हा नाराज झालेला आज दिसत आहे.
कालच मोहिते पाटील यांच्या प्रकृतीची चौकशीसाठी म्हणून आलेले सांगोल्याचे डॉ. देशमुख शेकापचे जयंत पाटील असे विरोधी गटाचे नेतेमंडळी विजयसिंह मोहिते पाटील यांना भेटून गेले हे सर्व पाहताच भाजपा च्या नेतेमंडळीने मोहिते पाटील यांच्या नाराजीचा अंदाज घेण्यासाठी गिरीश महाजन यांना अकलूज येथे पाठवण्यात आले. परंतु कार्यकर्त्यांच्या मनात असलेला रोष त्यांनी काल पाहिला आणि माढा च्या उमेदवारीबाबत वरिष्ठ नेतेमंडळींच्याकडे निरोप पोहोचतो म्हणून ते मार्गस्थ झाले.
दुसरीकडे शरद पवार यांनी मध्यंतरी विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली असता या भेटीच्या दरम्यान झालेला सुसंवाद काही कळाला नाही. परंतु या माढा लोकसभा मतदारसंघातील मतदार हे जाणकार असल्यामुळे त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाशी मोहिते पाटील यांनी पुन्हा एकदा जुळवून घेऊन शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी ही मोहिते पाटील यांनी हाती घ्यावी. त्यामुळे मोहिते पाटील यांच्या गटाला शरद पवार यांच्या गटाची तसेच मोहिते पाटील गटाची ताकद अशी दुधारी बळ मिळणार असे मतदारांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे.
राजकारणामध्ये आणि प्रेमामध्ये सर्व गुन्हे माफ असतात. राजकारणामध्ये कोणी कोणाचा शत्रू नसतो आणि कोणी कोणाचा मित्र नसतो. हे पुन्हा एकदा पाहायला मिळते की काय? असे या मतदारसंघातील जनतेला वाटू लागलेले आहे. शरद पवारांच्या वर असलेली नाराजी दूर करून मोहिते पाटील यांनी शरद पवार गटाशी सलोखा केल्यास माढा लोकसभा मतदारसंघातील खासदारकीची माळ मोहिते पाटील यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाला मानणारे लाखोच्या संख्येने मतदार आहेत. त्याचप्रमाणे विजयसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्व मानणारे देखील लाखोंच्या संख्येने मतदार आहेत. या दोन्ही मातब्बर नेत्यांची एकजूट झाल्यास या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. असे देखील जनतेतून व्यक्त केले जात आहे.
मोहिते पाटील यांच्या माळशिरस तालुक्यामधून, त्याचप्रमाणे माढा तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे ,त्याचप्रमाणे सांगोला तालुक्यातील शेकापाचे डॉ. देशमुख यांच्या मताची बेरीज केली असता मोहिते पाटील यांच्या गटाला सहज खासदारकी मिळू शकते व ते प्रचंड मताने निवडून येऊ शकतात. अशीच चर्चा सध्या मतदारसंघांमध्ये सुरू आहे.
मोहिते पाटील गटांनी जर का शरद पवार गटाशी जुळवणी केली आणि तुतारी हाती घेतल्यास त्यांना यश मिळू शकते. मोहिते गटाच्या हाताला तुतारीचे बळ मिळताच दुधारी प्रमाणे हे बळ लाभणार आहे. पाहूया मोहिते पाटील गट तुतारी घेतात की शांत बसतात.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा