"मोहिते पाटील यांची समजूत काढणार " .... रणजीत सिंह नाईक निंबाळकर
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर येथे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाड्यावर आज रोजी माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर आणि प्रशांत परिचारक यांच्या बंद खोलीतील चर्चा झाल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले माढा लोकसभा मतदारसंघात हजारो कोटी ची विकासकामे केली आहे.देशामध्ये आपल्या माढा मतदार संघातील कामे ही देशातील तिसऱ्या क्रमांकावर आहे.पंतप्रधान मोदी यांना पुन्हा एकदा निवडून द्यायचे आहे.म्हणून सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन एकजूटीने भाजपाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहे.
माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये सध्या मोहिते पाटील गटाचे धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपाकडून इच्छुक उमेदवार म्हणून त्यांची भाजपाकडे उमेदवारीची मागणी होती. परंतु ती मागणी पूर्ण न होता, सदरहू माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर झाली.
त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील मोहिते कुटुंब नाराज झाल्याचे सध्या तरी चित्र दिसून येत आहे. या मोहिते पाटील यांच्या नाराजी विषयी रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना विचारले असता ते म्हणाले की ती त्यांची नाराजी ही लवकरात लवकर आम्ही दूर करु असे त्यांनी सांगितले.
भाजपाच्या श्रेष्ठीनी ही उमेदवारी दिली असल्यामुळे भाजपाचे सहयोगी मित्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चे रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील या मतदारसंघांमधून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा सहयोगी मित्र असल्यामुळे भाजपाचा उमेदवाराला सहकार्य करणे हे युतीला धरून आहे. रामराजे निंबाळकर यांची देखील समजत काढण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांची लवकरच नाराजी दूर करणार आहोत. त्याचप्रमाणे मोहिते पाटील यांची देखील नाराजी दूर करणार आहे.
धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये गाव भेटीच्या माध्यमातून आपला संपर्क वाढवायला सुरुवात केली असल्यामुळे ते या निवडणुकीला उभे राहणार की काय ? असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. याविषयी बोलत असताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले मोहिते पाटील यांची नाराजी श्रेष्ठ दूर करतीलच त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते कुटुंबीयांना व त्यांच्या सहकार उद्योगांना सहकार्य केल्यामुळे मोहिते कुटुंब देवेंद्र फडणवीस यांचे विनंतीला मान देऊन भाजपाला विजय करण्यासाठी ते सहकार्य करतील. असे भाजपाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी आज रोजी सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा