"मी केलेली विकासकामे कार्यकर्ते नी जनतेला सांगावी" रणजितसिंह नाईक निंबाळकर


 पंढरपूर ( प्रतिनिधी) भाजपाच्या माझ्या कार्यकर्त्यांनी आपल्या या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये मी केलेल्या विकास कामाची माहिती कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी. असे आज सांगोला येथे भाजपाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी आज सांगोला येथे कार्यकर्त्यांच्या मेळावा मध्ये आपले मनोगत व्यक्त केले.

     सांगोल्याचा पाणी प्रश्न व त्यासाठी लागणारा निधी आम्ही दिलेला आहे. असे त्यांनी आवर्जून सांगितले. सांगोला तालुक्यामधून मला भरघोस मतदान मिळणार आहे. याची ग्वाही आमदार शहाजी बापू पाटील आणि दीपक आबा साळुंखे पाटील यांनी दिल्यामुळे या परिसरातून मला भरपूर मताधिक्य मिळणार आहे.

    सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये त्यांनी आपली भावना व्यक्त केली. रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी देशांमध्ये सर्वात जास्त विकास कामे केल्याची त्यांनी माहिती सांगितली. अशा या विकास कामे करणाऱ्या उमेदवाराला सांगोला तालुक्यातील जनता ही कदापि विसरणार नाही. असे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

       सांगोला तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या गटाचे दीपक आबा साळुंखे पाटील यांनी रंजीत सिंह नाईक निंबाळकर यांना मत देणे म्हणजे मोदी यांना मत देण्यासारखे आहे. आपल्या देशाला मोदी हे सर्वोच्च स्थानी नेणारे नेतृत्व आपल्याला लाभलेले आहे. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपल्याला रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून एक प्रतिनिधी लोकसभेमध्ये पाठवायचा आहे. तरी सांगोला तालुक्यातील जनतेने रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे. असे आवाहन दीपक आबा साळुंखे पाटील यांनी आज रोजी केले.

       या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून सांगोला तालुक्याचे शिवसेना शिंदे गट चे आमदार शहाजी बापू पाटील तसेच माजी विधान परिषद आमदार दीपक आबा साळुंखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे या तालुक्यातील सर्व भाजपा पदाधिकारी त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गट चे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे पदाधिकारी कार्यकर्ते हे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....