"पाच वर्षांतून पहिल्यांदाच जनतेला शुभेच्छा मिळू लागल्या" भावी खासदारांना आताच कसा उमाळा येऊ लागला.?
पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघातील पंचवार्षिक निवडणूक या जाहीर झाल्या आहेत .या निवडणुका जाहीर झाल्यापासून आजी-माजी आणि भावी खासदारांना जनतेची आठवण येऊ लागली आहे. जनतेच्या कामाची गोडी लागल्याने गल्लीतून दिल्लीत गेलेल्या लोकप्रतिनिधीला पाच वर्षातून एकदा तरी जनतेची आठवण ही यायलाच पाहिजे. एरवी वर्षातून, सहा महिन्यातून एकदा आपल्या मतदारसंघांमध्ये येऊन विकास कामे सुरू केल्याची माहिती सांगून जनतेला आपण विकास कामे करीत आहोत. याची आवर्जून आठवण करून देत. पुन्हा गल्लीतून दिल्लीत जाणारे हे लोकप्रतिनिधी यंदाच्या पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीचे तारीख जाहीर झाल्यापासून देशभर आजी-माजी आणि इच्छुक भावी खासदार,आजी माजी खासदार जनतेच्या भेटीसाठी आता गावोगाव फिरत असल्याचे दिसून येत आहेत .या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये त्यांनी एक गोष्ट मात्र विसरलेली नाही. ती गोष्ट म्हणजे मराठी माणूस हा उत्सव प्रेमी आहे. सणवार साजरे करणारा आहे. या उत्सवाचे निमित्त साधून सणाचे निमित्त साधून या मतदार बंधू-भगिनींना आपल्या शुभेच्छा या फोन द्वारे पोहोचवण्याचे देण्याचे काम आता हे आजी-माजी आणि भावी खासदार हे मेसेजच्या द्वारे शुभेच्छा जनतेला देऊ लागलेले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील जनता ही तशी भोळवटआहे.या जनतेमधील काही भोळवट लोक काही तरुण, काही उत्साही कार्यकर्ते या भावी खासदारांच्या सणानिमित्तच्या शुभेच्छेचा मेसेज आल्यानंतर ते गावभर मेसेज फिरवून दाखवत आहेत. मला राम सातपुते यांचा मेसेज आला. सणाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभेच्छा, प्रणिती ताई शिंदे यांचा सणाच्या शुभेच्छा आल्या या शुभेच्छा मिळाल्याचे पाहून जनता देखील हुरळून गेलेली दिसत आहे.
दिल्ली दरबारी जाणाऱ्या लोकप्रतिनिधी कडूñन ही सर्वसामान्य जनता जास्त काही अपेक्षा करीत नाही. संसदेमध्ये गावातील पाणी प्रश्न सुटावा., शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळावा, बेरोजगार तरुणाच्या हाताला काम मिळावे, आपल्या जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे वाढावे, ऊसाला चांगला मिळावा, महागाई कमी करावी.,पेट्रोल, डिझेल,गॅस दर कमी व्हावा.अशा या बारीक सारी अपेक्षा या सर्व सामान्य जनतेच्या असतात.आपल्या लोकप्रतिनिधींनी दिल्ली दरबारी जनतेच्या मागण्या मांडाव्यात. एवढीच काय ती या भोळ्या मतदार राजाची अपेक्षा असते.
रंगपंचमीच्या सणाच्या निमित्ताने आजी माजी खासदारांच्या आणि भावी खासदारांच्या जनतेला मिळालेल्या शुभेच्छा पाहून जनतेला असं वाटू लागले की आताच कसा खासदारांना उमाळा येऊ लागलेला आहे.?

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा