"शाळेचे संस्थापक किंवा शिक्षणाधिकारी त्रास देत असतील तर मला सांगा.....त्यांचा बंदोबस्त केला जाईल." .... मनसे म्हणजे एक प्लान प्राॅब्लेम स्वाॅल ".....मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे


 पंढरपूर ( प्रतिनिधी) माझ्या शिक्षक शिक्षिका बंधू-भगिनींना शाळेचे संस्थापक किंवा शिक्षणाधिकारी त्रास देतात किंवा देत असतील तर मला सांगा त्यांचा बंदोबस्त केला जाईल. मनसे म्हणजे एक प्लान प्रॉब्लेम सॉल्व असे मनसेचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेना शाखा पंढरपूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्याच्या प्रसंगी आपले मत व्यक्त केले. 

     शिक्षक शिक्षिका या बंधू-भगिनींना कोणतीही अडचण त्यांच्या शैक्षणिक कार्याचे बाबतीत येत असेल तर मला जरूर सांगा मी इथे अडचण दूर केल्याशिवाय राहणार नाही. आज या शिक्षक पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून गुणवंत शिक्षक हे या ठिकाणी आलेले आहेत. या शिक्षकांमध्ये नंदुरबार येथील एक शिक्षिका आदिवासी भागामधून आलेली आहे ती तिचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. नंदुरबार सारख्या आदिवासी भागातून आलेल्या शिक्षिका भगिनीने जे मत व्यक्त केले त्या आपल्या भाषणामध्ये म्हणाल्या की 80 टक्के आदिवासी मुलं हे शिक्षण घेत आहेत आणि अशा दुर्गम भागात असलेल्या या शिक्षका भगिनींचे कौतुक करावे तेवढे थोडे कमीच आहे. आपल्या देशाच्या राष्ट्रपती या द्रोपदी मूलभूत या देखील आदिवासीच आहेत. आपल्या शिक्षका मधून देखील राष्ट्रपती व्हायला हवे अशी अपेक्षा देखील दिलीप बापू धोत्रे यांनी व्यक्त केली. 

      शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब आहेत. आपल्या कोणत्याही अडीअडचणी समस्या त्या सांगा आम्ही त्या अडचणीचे,समस्येचे निरसन केल्याशिवाय राहणार नाही व शिक्षक शिक्षकांना न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. असे देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आज पुरस्कार सोहळ्यामध्ये व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....