"मुंबई, पुणे सारखी प्रगती व सुधारणा माढा मतदार संघात करणार " ..... अभिजीत आबा पाटील


 पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार केल्यानंतर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी माढा मतदारसंघातून आपला संपर्क मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यास सुरुवात केली आहे.गावभेट दौरा, घोंगडी बैठक, त्याचप्रमाणे विविध सामाजिक, सांस्कृतिक महोत्सव व कार्यक्रम करून आणि माढा तालुक्यातील शेतकरी बांधवांचा आवडती बैलगाडा शर्यत, तरुणांच्या आवडीचा कुस्ती स्पर्धा असे अनेक कार्यक्रम आयोजित करुन अभिजीत आबा पाटील हे माढा तालुक्यातील मतदारांना आपलेसे करण्यात यशस्वी झाले चे दिसून येत आहे.
    माढा तालुक्यातील असंख्य तरुण मतदार हे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात स्थायिक झालेले आहेत. या आपल्या मतदारांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी गुरुवारी त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी विकासाची व्हिजन असलेले चेअरमन अभिजीत पाटील यांना या मतदारांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आला. पिंपरी चिंचवड भागातील मतदारांना कलासागर हॉल येथे सकाळी तर पुणे येथील मतदारांशी हडपसर येथील राजीव लॉन्स या ठिकाणी जनसंवाद साधला. या संवाद कार्यक्रम प्रसंगी माढा मतदार संघात मूलभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण तसेच अशा विविध विषयावर प्रत्येकाने आपापली भूमिका मांडली. पुणे मुंबईसारखा आपलं गाव आपल्या तालुक्यातील सुधारणा व्हावी यासाठी प्रत्येकाची तळमळ दिसत होती. त्याच मताचा मी जाहीरनामा विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करणार असून ती ब्ल्यू प्रिंट लवकरच आपल्यासमोर सादर केली जाईल. असे अभिजीत पाटील यांनी या मतदारांना विश्वास देऊन सांगितले. 
    या पुणे येथील माढा तालुक्यातील रहिवासी मतदार यांची भेट झाल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर एक नवीन प्रकारची ऊर्जा आणि बळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षी या स्नेह मेळावा आयोजन करण्यात येईल, आणि एकत्र येण्याचा संकल्प करून प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये उभे राहण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित मतदारांना देण्यात आले. या पुणे येथील सर्व मतदारांची संवाद साधल्यानंतर हा प्रतिसाद पाहता नक्कीच येत्या काळात यश मिळेल अशी आशा अभिजीत पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी हजारोच्या संख्येने तरुण ज्येष्ठ नागरिक महिला माता-भगिनी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....