"सुधीर भोसले यांची जिल्हा संघटक म्हणून निवड" ... राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हा संघटक पदी निवड
पंढरपूर ( प्रतिनिधी) देशाचे नेते शरद चंद्रजी पवार यांच्या विचाराचा वारसा पक्षाची तत्वे व ध्येय धोरणे ही तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. सर्वसामान्य जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी व त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. असे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर भाऊ भोसले यांची सोलापूर जिल्हा संघटक पदी निवड झाली त्या प्रसंगी बोलत असताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पंढरपूर शहर व तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाचे कट्टर समर्थक शरद पवार प्रेमी सुधीर भोसले यांची पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते जिल्हा संघटक पदी निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर माजी महापौर महेश कोठे, सांगली व्यापार उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश पाटील, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण, पंढरपूर तालुका अध्यक्ष संदीप मांडवे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष गुलाब मुलानी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश पाटील यांच्यासह पक्षाच्या जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संघटक म्हणून महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी परिश्रम घेऊ. अशी ग्वाही सुधीर भोसले यांनी दिली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा