" मालक.... तुम्ही निवडणूकीला उभा रहा ढील्ल पडू नका, आम्ही हाय संगतीला" ... कार्यकर्ते


 पंढरपूर ( प्रतिनिधी) २०१९ च्या पोट निवडणूक लागली असता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये विधानसभेची ही जागा कै.भारत भालके यांनी विविध पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती.व ते यशस्वी झाले होते.  त्यांच्या दुःख द निधनानंतर या ठिकाणी पोट निवडणूक लागली.तेव्हा प्रशांत परिचारक हे विधानपरिषदेचे सदस्य होते.त्यामुळे त्यांनी भाजपा कडे उमेदवारी मागुन देखील मिळाली नाही.आमदार समाधान दादा अवताडे यांना उमेदवारी दिली गेली.व त्यांना या निवडणुकीत सहकार्य करावे अशी विनंती भाजपा चे  श्रेष्ठींनी केल्यामुळे ते या निवडणुकीत उमेदवार म्हणून नव्हते.सर्व यंत्रणा व  लोकसंग्रह मोठा असूनसुद्धा ते दूर राहिले.आणि समाधान दादा अवताडे यांना भाजपाचे उमेदवार म्हणून निवडून येण्यास मदत केली.

   नैसर्गिक नियमानुसार प्रशांत परिचारक यांना आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत समाधान दादा अवताडे यांनी मदत करायला हवी.कारण समाधान दादा अवताडे यांना निवडून आणण्यासाठी परिचारक यांनी प्रयत्न केले व त्यांना विजयी करून दिल्यामुळे प्रशांत परिचारक यांना येत्या निवडणुकीमध्ये आमदारकीसाठी संधी द्यावी.व समाधान दादा अवताडे यांनी परिचारक यांच्या साठी भाजपा कडून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे.अशी भोळी व साधी सरळ भावना सर्व सामान्य कार्यकर्ता ची आहे.परंतू एकदा सत्ता व खूर्ची ताब्यात आल्यानंतर कुणी सोडत नाहीत.तोच अनुभव सद्या परिचारक घेत आहेत.सर्वप्रकारची मदत त्यांनी निवडून आणण्यासाठी केली होती.ही भावना सामान्य कार्यकर्ता ची असल्याने हे कार्यकर्ते आता प्रशांत परिचारक यांना निवडणूक लढविण्यासाठी हट्ट धरत आहे.

     प्रशांत परिचारक यांच्या पांडुरंग परिवाराचे सभासद व कार्यकर्ते पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे व परिचारक यांना निवडणूक मध्ये पडणारे मतदान हे लक्षवेधी मतदान असते.६०, ते ७० हजार मतदार हे कायम परिचारक यांच्या पाठीशी उभा राहिला चे दिसून येते.

     आपल्या दुर्लक्षित केले जात आहे याची जाणीव प्रशांत परिचारक यांना झाल्यामुळेच ते प्रथम मंगळवेढा येथे मंगळवेढा पाणी उपसा सिंचन योजनेच्या कार्यारंभ सोहळा प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन देखील गैरहजर राहिले होते.परिचारक हे नाराज झालेले आहेत.याची जाणीव परिचारक यांनी भाजपा ला करून देण्यात यशस्वी झाले.म्हणूनच त्यांना सोलापूर व अक्कलकोट येथे भाजपाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलवण्यात आले.

    परिचारक आणि पांडुरंग परिवार हे सद्या कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची ही मानसिकता तयार झाली आहे.कार्यकर्ते बैठकांमध्ये आपले मनोगत व्यक्त करीत आहेत.कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्ते करु लागले आहेत.त्यामुळे परिचारक यांना कार्यकर्तांचे ऐकावं लागणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.

   परिचारक यांनी आता गावभेट दौरा सुरू केलेला आहे.आणि घोंगडी बैठक घेऊन मतदार व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी ते सक्रिय झाले आहे.

    प्रत्येक गावभेट दौरा मध्ये विविध गावांमधून कार्यकर्ते परिचारक यांना म्हणू लागले आहेत."मालक तुम्ही ढील्ल पडू नका.आम्ही हाय संगतीला " असा सल्लाही हे कार्यकर्ते देऊ लागले आहेत.

     पाहूया प्रशांत परिचारक हे कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार की अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....