"पंढरपूर शहरातील महिला आर्थिक बाबतीत सक्षम व्हावेत "..... मनसे नेते दिलीप बापू धोत्रे


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर शहरातील महिला आर्थिक बाबतीत सक्षम व्हावेत म्हणून आद्य वीरशैव महिला मंडळ व मनसे ॲग्रो इंडस्ट्री लि.यांच्या संयुक्त विद्यमानाने हा एक्सपो भरवला आहे.

    मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना ते म्हणाले की पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील व पंढरपूर शहरातील महिलांना आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी मनसे व आद्य वीरशैव महिला मंडळ यांच्यातर्फे आयोजित हा उपक्रम असून दिपावलीच्या सणानिमित्त सर्वसामान्य जनता ही सणाची खरेदी करत असते.या सणाची खरेदी टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित केले आहे.दोनशे स्टॉल हे महिलांच्या साठी मोफत ठेवले आहे.या स्टॉल मधून विविध प्रकारच्या दिपावलीच्या वस्तू,दिवे, पणती,उटणे, आकाशकंदील,दिपावलीचे गोडधोड पदार्थ, तसेच रेडीमेड कपडे,आदी विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत.

    या स्टॉल वरुन लोकांनी खरेदी करावी.जेणे करुन महिलांना आर्थिक बाबतीत लाभ होईल.महिला आर्थिक बाबतीत सक्षम झाल्यास त्या आपले कुटुंब व्यवस्थीत चालवू शकतात.महिलांना एकप्रकारे प्रोत्साहन मिळावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ‌तरी पंढरपूर शहर व तालुक्यातील लोकांनी या ठिकाणी येऊन खरेदी करावी असे आवाहन मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केले.

    यावेळी उपस्थित माजी नगरसेवक महंमद उस्ताद, मनसेचे नेते शशीकांत पाटील, संतोष कवडे, गणेश पिंपळनेरकर,संजय बंदपट्टे.आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....