शरद पवार संभ्रमात?.... पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये" तुतारी " कुणाच्या हाती द्याची?....


 पंढरपूर ( प्रतिनिधी) विधानसभेच्या निवडणूकीचे सद्या वारे वाहू लागले आहे.लोकसभेच्या निवडणूकी मध्ये महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद जनतेतून मिळाल्या मुळे सद्या या महाविकास आघाडीला महत्व प्राप्त झाले आहे.

   शरद पवार यांच्या पक्षाकडे सद्या उमेदवारी मिळावी म्हणून सर्व पक्षीय राजकारणी प्रयत्न करत आहेत.शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना आपण आपल्या मतदारसंघा मधून कसे निवडुन येऊ शकतो हे सांगू लागले आहेत.

    पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये देखील अशीच अवस्था निर्माण झाली आहे.पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील सर्व इच्छुक उमेदवारांनी त्यांची भेट घेऊन उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करत आहेत.शरद पवार यांच्या पक्षाला  महाराष्ट्र मधून मिळणार प्रतिसाद आणि शरद पवारांच्या सारख्या किमयागार माणसा मुळे आपण निवडून येऊ शकतो याची खात्री या सर्व इच्छुक उमेदवारांना  झाल्या मुळे ते शरद पवारांना भेटून उमेदवारी साठी प्रयत्न करु लागले आहेत.

    पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अनेक मान्यवर नेते मंडळी हे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.शरद पवार यांची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून त्यांना व्यकतीक भेट घेतली जात आहे.तसेच आपल्या कार्यकर्ते ना हजारो संख्येने शरद पवारांना भेटून आपल्या नेत्याला उमेदवारी दिली जावी म्हणून प्रयत्न केले जात आहे.पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील भगिरथ भालके यांनीही त्यांची भेट घेऊन आपण इच्छुक असल्याचे सांगितले आहे.गत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कडून भगिरथ यांना मिळालेले मतदान पहाता ते सक्रिय झाले आहेत.यंदा ही निवडणूक तीरंगी चौरंगी होण्याची शक्यता असल्याने त्याचा फायदा आपल्याला होईल.याची खात्री भगिरथ भालके यांना असल्यामुळे ते शरद पवारांच्या पक्षाकडे उमेदवारी मागत आहेत.‌ 

    या मतदारसंघातील दुसरे इच्छुक कासेगाव येथील वसंतराव देशमुख यांनी देखील शरद पवारांच्या पक्षाकडे उमेदवारी ची मागणी केली आहे.

परिचारक गटातील ते हुकमी कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.परिचारक यांना त्यांनी आजपर्यंतचे जेवढे विधानसभा निवडणूक झाल्या होत्या त्या निवडणुकीत परिचारक यांना विजयी करण्यात मोलाचा वाटा आहे.हे वसंतराव देशमुख देखील शरद पवारांच्या पक्षाकडे उमेदवारी मागून आपण इच्छुक असल्याचे सांगितले आहे.

   परिचारक गटाचे व पांडुरंग परिवाराचे नेते व माजी विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील उमेदवारी ची मागणी करण्यात आली.कार्यकर्तेनी देखील आपण शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणूक लढवावी.उमेदवारी दिली तर ठीक अन्यथा अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्ते करु लागले आहेत.

    प्रशांत परिचारक यांना कैद.भारत भालके यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती तेव्हा परिचारक यांना चांगले मतदान झाले होते.आणि त्याचप्रमाणे परिचारक यांच पांडुरंग परिवार अद्याप ही अभेद्य असल्यामुळे ते निवडणूक जिंकू शकतात.अशी खात्री परिचारक यांना आहे.त्यामुळे ते शरद पवारांच्या पक्षाकडे उमेदवारी मागत आहेत.

    पंढरपूर शहरातील लोकप्रिय उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी देखील शरद पवारांच्या पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.नागेश भोसले यांचे पंढरपूर शहर व पंढरपूर तालुक्यातील गावांमधून जनसंपर्क चांगला आहे.मंगळवेढा तालुक्यातील गावांमध्ये नागेश भोसले यांच्या वाहतूक व्यवसाया मध्ये काम करणारे कामगार लोकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि नागेश भोसले यांचे सर्वसमावेशक सर्वत्र सहभाग आहे.सर्वसामान्याशी जवळीक निर्माण करण्याची त्यांची क्षमता पहाता नागेश भोसले हे आपले अस्तित्व दाखवून देऊ शकतात.त्यांनी देखील शरद पवारांच्या पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

    पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील या इच्छुक उमेदवारांची संख्या पहाता शरद पवारांना देखील कोडं पडलेले आहे.वरील सर्व इच्छुक उमेदवारांनी आपल्या मतदारसंघातील विविध गावांमध्ये जाऊन उपक्रम राबविले जात आहेत.गावभट दौरा करत आहेत.घोंगडी बैठक घेतली जात आहे.आपल्याच उमेदवारी मिळणार या आशेने हे उमेदवार कार्यकर्ते ना कामाला लागा असे सांगत आहेत.

   शरद पवार यांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत विजयी होणारा उमेदवार हवा आहे.त्यामुळे या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.सर्वच उमेदवार तुल्यबळ असल्याने कोणाला उमेदवारी द्यायची अशी संभ्रमावस्था शरद पवारांची झाली असावी अशी चर्चा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये सद्या सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....