"साहेब....मला वाचवा असे विरोधक म्हणू लागले " ... पायाखालची वाळू घसरू लागली वाटतं....... अभिजीत आबा पाटील
पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा तालुक्यातील प्रत्येक गावांमधून आपली भूमिका स्पष्ट करताना अभिजीत आबा पाटील यांनी माढा तालुक्यातील असंख्य समस्या अडचणी,रखडलेली कामे, पाणीप्रश्न, तरुण बेरोजगारांचे प्रश्न,ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाला मिळत असलेला कमी दर अशा अनेक गोष्टी वर कायम स्वरुपी तोडगा गेल्या पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीत या विरोधकांनी का काढला नाही? ज्या शरद पवारांच्या पक्षामधून त्यांनी सत्तास्थाने मिळवली त्याच शरद पवारांना ऐनवेळी संकटात टाकून पळ काढणारे हे विरोधक आता " साहेब..मला वाचवा " म्हणू लागले.मी माढा विधानसभा मतदारसंघामधून उमेदवार म्हणून उभा राहणार आहे .हे विरोधकांना कळाले पासून त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे.असे श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमन अभिजीत पाटील यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले.
माढा तालुक्याला विकासापासून दूर ठेवण्याचे पाप विरोधकांनी केले आहे.त्याचे प्रायश्चित्त त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून घ्यावे लागणार आहे.
माढा तालुक्यात कोणतेही मोठे उद्योग धंदे नाहीत.उद्योग व्यापारासाठी आवश्यक रस्ते चारी बाजूंनी असून या तालुक्यातील बेरोजगारांच्या साठी एमआयडीसी उपलब्ध नाही.त्यामुळे मोठे उद्योग येऊ शकत नाही.प्रस्थापित लोकप्रतिनिधींनी कधीच येथील बेरोजगारांच्या हिताची काळजी घेतली नाही.त्यामुळे येथील युवकाला बदल हवा आहे.
महिलांच्या साठी गृह उद्योग, लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.अशा अनेक तक्रारी येथील जनता गावभेटीच्या वेळी सांगत आहेत.या महिला व बेरोजगार यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कधीच प्रयत्न या विरोधकांनी केला नाही.
पुणे, मुंबई येथे कामासाठी गेलेल्या माढा तालुक्यातील असंख्य लोक आपल्या गावातील असुविधा चार पाढा वाचून दाखवत आहेत.माढा शहर हे तालुका असूनही कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न येथील लोकप्रतिनिधी नी केले नाहीत.सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी चांगले हाॅस्पिटल नाही.की शैक्षणिक संस्था या ठिकाणी आलेल्या नाहीत.अभियांत्रीक महाविद्यालय आले नाहीत.त्यामुळे या परिसरातील मुलांना अन्य ठिकाणी जावे लागते.अशा अनेक असुविधा या माढा तालुक्यात आहेत.
माढा मतदारसंघांतील जनतेला आता बदल हवा आहे.
या मतदारसंघातील जनतेला विकासाची कामे कशी असतात हे कधी सांगितले नाही.या मतदारसंघातील महिलांना माता भगिनी यांना आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले गेले नाही.या माढा तालुक्यातील जनतेला माझे ही विकासाची भाषा आता समजू लागली असल्यामुळे या जनते कडून मला प्रतिसाद मिळत आहे.या मतदारसंघाचा विकास केल्या शिवाय राहणार नाही.असे आपल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला उपस्थित अनेक मान्यवर उपस्थित होते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा