"मी बोलतो कमी....…..पण कामे माझी जास्त असतात" ... आमदार समाधान दादा अवताडे विकासकामांचा कार्यारंभ सोहळा
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या पहिल्या आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांनी हजारो कोटींचा निधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विविध विकास कामासाठी आणलेला आहे.आपल्या मतदारसंघातील विविध गावांमधील रस्ते,समाज मंदीर, पिण्याच्या पाण्याची सोय, संविधान भवन, मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांना भेडसावणारा पाणी प्रश्न, पंढरपूर तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून एम आय डी सी ची मंजुर करुन आणण्यासाठी केलेले अथक प्रयत्न या प्रयत्नांना आलेले यश पहाता आमदार समाधान दादा अवताडे म्हणतात ते बरोबर आहे." मी बोलतो कमी...पण कामे माझी जास्त असतात" अशी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांत समाधान दादा अवताडे यांची झालेली आहे.
आमदार समाधान दादा अवताडे यांनी मंजूर करून आणलेल्या विविध विकास कामांचा कार्यारंभ सोहळा उद्या दिनांक ७ आक्टोबर २०२४ रोजी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
आमदार समाधान दादा अवताडे यांनी मंजूर करून आणलेल्या विविध विकास योजना मंगळवेढा उपसा सिंचन योजना, पंढरपूर एमआयडीसी,
तसेच तामदर्डी बंधारा,कर्जाळ कात्राळ,हुलजंती,पौट,निबोणी, नंदेश्वर,गोणेवाडी,ले.चिंचोळी N H 166 पर्यंत रस्ता.इत्यादी विविध विकास कामांचा कार्यारंभ सोहळा पार पडणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.कार्यक्रमाचे स्थळ..आंधळगाव- लक्ष्मी दहिवडी रोड आंधळगाव ता.मंगळवेढा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा