तुतारी कोणाच्या हाती द्यावी? साहेबांना पडलेले कोडे.....
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील उमेदवार यांची उमेदवारी मागण्यासाठी चाललेली धडपड, या धडपडी वरून काही दिवसापूर्वी "शरद पवार संभ्रमा अवस्थेत" हे वृत्तांकन केले होते. आम्ही केलेले हे वृत्तांकन आजच्या स्थितीला देखील बरोबर ठरते की काय? असे वाटू लागले आहे.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे आणि त्याच भाजपा पक्षाचे विधान परिषद चे माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे भाजप निवासी असलेले उमेदवार त्यापैकी समाधान आवताडे ही भाजपाकडून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि प्रशांतराव परिचारक भाजपा कडून आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही? या शंके मुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या तुतारीला हाती घ्यावे की काय? असे विचार करत त्यांनी आपले असंख्य कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते मंडळी शरद पवार यांच्या भेटीला पाठवून अंदाज घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्या प्रयत्नाला अद्याप तरी यश आलेले दिसून येत नाही.
परिचारक गटाचे कार्यकर्ते व पांडुरंग परिवार या परिवारातील असंख्य कार्यकर्ते यांनी प्रशांत रावांना अपक्ष निवडणूक लढवावी असे देखील सूचित केलेले आहे. जर शरद पवारांची तुतारी मिळत नसेल तर आपण अपक्ष ही निवडणूक लढवावी. पांडुरंग परिवार त्यांच्या पाठीशी आहे. अशी कार्यकर्त्यांमधून त्याचप्रमाणे गाव भेटीच्या दौऱ्यामधून ते गावातील ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितले. मतदार व सर्वसामान्य जनता व कार्यकर्ते ज्येष्ठ नेते हे जे विचार घेतील, जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. असे म्हणून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवायची की तुतारी हाती घेऊन निवडणूक लढवायची? हे अद्यापही ठरवलेले नाही.
त्याचप्रमाणे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेतील गत पोट निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य घेणारे भगीरथ भालके हे देखील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तुतारी घेऊन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. परंतु मध्यंतरी त्यांनी तेलंगणा येथील बी आर एस पक्षाकडे प्रवेश केला. तिथून ते माघारी फिरले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आय काँग्रेसचे खासदार प्रणिती ताई शिंदे यांचा प्रचार देखील त्यांनी केला.या निवडणुकीमध्ये आय काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. व त्या प्रयत्नाला यश देखील आले. भगीरथ भालके यांनी देखील शरद पवार पक्षाचे तुतारी चिन्ह हे आपल्यालाच मिळणार आहे. असे आपल्या जनसंवाद मेळावा मधून ते सांगत आहेत. परंतु त्यांना देखील शरद पवार यांच्या पक्षाकडून कुठलाच निर्णय अद्यापही जाहीर झालेला नाही. त्यामुळे भगीरथ भालके देखील या उमेदवारीच्या यादीकडे डोळे लावून बसले आहेत.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीमध्ये राजकारणाच्या सोबत अर्थकारण देखील मोठ्या प्रमाणामध्ये होणार असल्याचे सद्यस्थितीला चित्र दिसून येत आहे. राजकारणाच्या सोबत अर्थकारण हे मजबूत असेल तर उमेदवार निवडून येतो. अशी कार्यकर्त्यांची मनाची समजूत आहे. असे देखील कार्यकर्त्यांमधून व्यक्त केले जात आहे. भाजपाचे आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या तीन-चार वर्षांच्या आमदारकीमध्ये हजारो कोटीचा निधी आणून विकास कामे त्यांनी मार्गी लावलेले आहेत. या कामाच्या जोरावर त्यांनी उमेदवारीची मागणी केलेली आहे. परंतु भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये त्यांचा नाव नसल्यामुळे त्यांच्या मनात देखील आपल्याला भाजपा कडून उमेदवारी मिळते की नाही? अशी शंका निर्माण झालेली आहे. कारण गत पोट निवडणुकीमध्ये भाजपाचे आमदार समाधान आवताडे यांना प्रशांतराव परिचारक यांच्या परिचारक गट व पांडुरंग परिवार ने भरपूर सहकार्य केल्यामुळे ते निवडून आले असे परिचारक गटाकडून सांगण्यात येते. आजच्या स्थितीला प्रशांतराव परिचारक हे आपली वेगळी चूल मांडण्याचा विचारात आहेत. त्यामुळे भाजपाचे सद्यस्थितीचे आमदार समाधान आवताडे यांचे निवडून येण्याचे अंदाज चुकीचे ठरू पाहत आहेत. त्यामुळे भाजपा पक्षाला देखील भाजपाची उमेदवारी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमधून कोणाला द्यावी? अवताडे की परिचारक? अशी भाजपाची देखील संभ्रमावस्था अवस्था झालेली आहे. ज्याप्रमाणे शरद पवार यांना देखील या मतदारसंघामधून भगीरथ भालके यांना उमेदवारी द्यावी की परिचारक यांना उमेदवारी द्यावी? की अन्य कोणाला ?अशी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील गत पोट निवडणुकी मधील दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य घेणारे भगीरथ भालके हे गेल्या पोट निवडणुकीमध्ये एक लाख दहा हजारच्या मताधिक्य मिळवले होते. त्यामुळे भगीरथ भालके यांच्याकडे देखील शरद पवार यांचा कल झुकताना दिसून येतो. परंतु भगीरथ भालके अर्थकारणामध्ये कमी पडतात की काय? अशी शंका तुतारीच्या पक्षाच्या नेतृत्वाला झालेली आहे. दुसरीकडे प्रशांतराव परिचारक यांना तुतारीची उमेदवारी द्यावी म्हटले तर आर्थिक बाबतीत ते सक्षम आहेत. परंतु जनाधार त्यांना लाभेल का नाही? हा देखील प्रश्न शरद पवार यांना भेडसावत असणार आहे. त्यामुळेच या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या तुतारी साठी उमेदवारी कोणाला द्यायची अशी संभ्रमावस्था आहे. त्याचप्रमाणे भाजपामध्ये देखील कमळाचे फुल कोणाच्या हाती द्यायचे असा प्रश्न पडलेला आहे.
आता पाहूया कोणाला उमेदवारी मिळते .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा