"आम्ही गरीब आठ ते दहा विद्यार्थ्यांंची फी माफ करुन त्यांना मदत करतो"..... डॉ.शीतल शहा.


पंढरपूर ( प्रतिनिधी) आम्ही गरजू गरीब मुलांना शालेय फी माफ करुन त्यांना मदत करतो.त्यांना शालेय आवश्यक वस्तू देऊन मदत करतो.असे आपल्या मनोगत व्यक्त करताना डॉ.शीतल शहा म्हणाले.
    आज माॅडर्न एज्युकेशन सोसायटीचे अरिहंत पब्लिक स्कूल पंढरपूर येथे या अरिहंत पब्लिक स्कूल पंढरपूर या शैक्षणिक संस्थाची पन्नास वर्षांकडे वाटचाल सुरू झाली असून त्या प्रसंगी बोलत असताना डॉ.शीतल शहा पुढे म्हणाले की काही वर्षांपूर्वी कोरोना ही महामारी संपूर्ण जगभर पसरली होती.या दोन वर्षांच्या काळामधील शैक्षणिक फी ही ५०/टक्के रक्कम ही माफ केली आहे.गरीब हुशार गरजू विद्यार्थ्यांना मदत ही कायमस्वरूपी केली जाते.या अरिहंत पब्लिक स्कूल ला पंढरपूर मधील सर्व पालकांनी नेहमी प्रोत्साहन दिले आहे.या पालकांच्या मुळे आम्ही या संस्थेला प्रगती पथावर नेत आहोत.असे संस्थेचे अध्यक्ष डॉ शीतल शहा यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
   या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर डॉ.अर्जुन भोसले डी वाय एस पी पंढरपूर, किर्तनकार जयवंत बोधले महाराज, डॉ.पटवा , उज्ज्वल दोशी, वैशाली दोशी,प्रतिभा दोशी, मिलिंद शहा, पत्रकार वीरेंद्र उत्पात,तोंडे ताई, आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....