" पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये" कमळ" प्रशांत परिचारक यांनी फुलवले"....प्रणव परिचारक


 पंढरपूर ( प्रतिनिधी) संपूर्ण राज्यामध्ये आचारसंहिता जाहीर होताच सर्व पक्षांमधील हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे आज दिसून येत आहे. 

    पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील भाजपच्या गोठा मध्ये यंदाची विधानसभेची उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा भाजपामध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्ये आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये सुरू आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार समाधान दादा अवताडे यांना गेल्या पोटनिवडणुकीमध्ये प्रशांत परिचारक यांचा परिचारक गट आणि पांडुरंग परिवार या परिचारक गटाच्या समूहाने भाजपाचे आमदार समाधान दादा अवताडे यांना निवडून आणण्याचे मोठे काम केलेले आहे. यापूर्वी भाजपाचे कमळ या पंढरपूर मंगळवेढा परिसरामध्ये कधीही फुललेले नव्हते. परंतु या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये भाजपाचे कमळ फुलवण्याचे काम प्रशांत परिचारक यांनी केले आहे. असे वक्तव्य युवा नेते प्रणव परिचारक यांनी पत्रकारांच्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले. 

    गेल्या पोट निवडणुकीमध्ये भाजपाचे समाधान आवताडे यांना निवडून आणण्याचे काम केल्यानंतर काही दिवसातच समाधान आवताडे व परिचारक यांच्यामध्ये दुही निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत होते. प्रशांत परिचारक यांनी भाजपाला दिलेला शब्द गेल्या पोट निवडणुकीमध्ये पाळला. त्यांच्या सांगण्यामुळे भाजपा उमेदवाराला निवडून देण्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी व जनतेने सहकार्य केलेले आहे. यंदाच्या येत्या 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने प्रशांत परिचारक यांना तिकीट देण्यात यावे. अशी मागणी त्यांचे कार्यकर्ते व ज्येष्ठ नेते मंडळी सध्या करीत आहेत. 

    प्रशांत परिचारक यांनी आपण कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळवावी व निवडणूक लढवावी अशी विचारणा करण्यासाठी मंगळवेढा त्याचप्रमाणे पंढरपूर शहर तालुका या मतदारसंघामधून गाव भेटीच्या दौऱ्यामध्ये त्यांनी सर्वसामान्य जनतेशी, मतदारांशी जनसंवाद साधत आहेत. गावोगावी जाऊन वाड्यावस्त्यांवर जाऊन घोंगडी बैठक  करून या बैठकीमधून सर्वसामान्य मतदारांचे व कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी ते गाव भेट दौरा सध्या सुरू केलेला आहे. या गावभेटीच्या माध्यमातून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मतदार व कार्यकर्ते यांनी प्रशांत परिचारक यांना स्पष्ट सांगितलेले आहे, की यंदा कोणाच्याही पाठीमागे न जाता स्वतंत्र आपण निवडणूक लढवावी. अशी भावना लोकांच्या मधून व्यक्त होत आहे. 

    तरी पांडुरंग परिवार व परिचारक गटातील कार्यकर्त्यांचे बरोबर संवाद साधून हा निर्णय घेण्याचा ठरवल्याचे प्रणव परिचारक यांनी सांगितले.      भाजपाला निवडून आणण्यासाठी आतापर्यंत परिचारक कुटुंबाने  काम केलेले आहे. याची जाणीव भाजपा श्रेष्ठींना आहे. त्यामुळे आम्ही आशावावादी आहोत आणि शेवटी सर्वसामान्य जनता पांडुरंग परिवारातील कार्यकर्ते सभासद आणि परिचारक गटातील मान्यवर नेते कार्यकर्ते यांच्याशी विचार विनिमय करून कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवायची की स्वतंत्र अपक्ष लढवायची हे ठरवले जाणार आहे. अशी माहिती प्रणव परिचारक यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....