"भव्य नोकरी महोत्सव" आजी-माजी सत्ताधाऱ्यांनी बेरोजगारांसाठी जे केले नाही ते अनिल दादा सावंत करणार.


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदार संघामधून उदयास येत असलेले उमलते नेतृत्व भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल दादा सावंत यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधील असंख्य बेरोजगारांच्यासाठी त्यांच्या हाताला काम मिळवून देण्याच्या उद्देशाने भव्य नोकरी महोत्सव उपक्रम राबवण्यात येणार आहे. रविवार दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी पंढरपूर शहरातील तनपुरे महाराज मठ या ठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत नाव नोंदणी करण्यासाठी लिंक जाहीर केलेली आहे.https// maharastrajo fair.com/ anil sawant/


 https// forms.gle

 /Ld9KSTyfuo9zg2H29

त्यावरील लिंक वर नाव नोंदणी करावी असे आव्हान बेरोजगार तरुणांना करण्यात आले आहे. 

      अनिल दादा सावंत यांनी काही मोजक्याच दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण पंढरपूर मंगळवेढा मतदार संघामध्ये आपल्या विविध कार्याच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमातून, सांस्कृतिक कार्यक्रमामधून आणि त्याचप्रमाणे बेरोजगार लोकांच्या हाताला काम मिळवून देण्याच्या उद्देशाने हा भव्य नौकरी महोत्सव 2024 हा आयोजित करण्यात आलेला आहे.

      आज पर्यंत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्याच्या उद्देशाने कुठल्याही आजी-माजी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केलेले नाहीत. म्हणून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, बँकिंग, फायनान्स रिटेल बीपीओ हेल्थकेअर सेक्युरिटी हॉस्पिटल ऑटोमोबाईल, फार्मा, आयटी इंजिनिअर क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमध्ये तरुण-तरुणींना सुवर्णसंधी यामध्ये कमीत कमी शैक्षणिक पात्रता पाचवी पास पासून ते दहावी बारावी पदवीधर आयटीआय डिप्लोमा इंजीनियर विविध शिक्षण घेतलेले युवक युवती सहभागी होऊ शकतात. वयाची 18 ते 30 पर्यंत लागू असणार आहे.

    अनिल दादा सावंत यांचे बेरोजगारांच्या विषयी असलेली आस्था व बेरोजगारांचे प्रश्न सुटावेत म्हणून भव्य नोकरी महोत्सव त्यांनी आयोजित केलेला आहे .याचा लाभ पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील युवकांनी घ्यावा असे आवाहन केलेले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....