"आमदार समाधान दादा अवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आपले पाय घट्ट रोवले"


"पंढरपूर ( प्रतिनिधी) विधानसभेच्या निवडणुकीचे वारे सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर वाहू लागलेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये देखील असेच निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागलेले आहे. प्रत्येक पक्षाचे नेते म्हणवणारे आता भावी आमदार म्हणून स्वतःला डिजिटल फ्लेक्स वर झळकवू लागलेले आहे. 
    पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील गत विधानसभेच्या पोट निवडणुकीमध्ये समाधान अवताडे यांनी बाजी मारत भाजपाचा उमेदवारीवर ते निवडून आले. एकूण तीन विधानसभेचा अनुभव गाठीशी असलेले समाधान दादा अवताडे यांनी आपल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तिन्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या मतदारसंघांमध्ये मतदार आपल्याला आपल्या कार्याला प्रतिसाद देतात किंवा कसे हे जाणून घेतलेले आहे. 60 ते 65 हजार मतदान त्यांनी कायमस्वरूपी आपल्या पदरामध्ये पाडून घेतलेले आहे. आमदार समाधान दादा अवताडे यांना मानणारा मंगळवेढा तालुक्यातील व शहरातील मतदार त्याचप्रमाणे पंढरपूर शहर व ग्रामीण भागामध्ये देखील त्यांनी केलेल्या कार्याच्या माध्यमातून आता समाधान दादा अवताडे यांच्या कार्याला मानणारा व त्यांच्या कार्याला प्रतिसाद देणारा मतदार वर्ग सध्या पंढरपूर शहर व ग्रामीण भागामध्ये तयार झालेला आज रोजी दिसून येत आहे. 
     आमदारकीच्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये समाधान आवताडे यांना मिळालेल्या आमदारकीच्या कारकिर्दीचे खरे पाहता तीनच वर्ष त्यांना लाभलेले आहेत .या तीन ते चार वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी हजारो कोटीचा निधी शासनाकडून आपल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी आणलेला आहे. मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांना कायमस्वरूपी भेडसावणारा हा पाणी प्रश्न त्यांनी आपल्या तीन वर्षाच्या अल्पावधी कालावधीमध्ये मिटवला आहे. या पाणी योजने साठी मंजुरी व निधी आणण्याचे काम समाधान आवताडे यांनी केलेले आहे. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील जनता आमदार समाधान आवताडे यांच्या कार्याला विसरणार नाही हेही तेवढेच खरे आहे. 
     पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील रस्ते, दिवाबत्ती ड्रेनेज त्याचप्रमाणे पंढरपूर शहरातील विकास कामे हे तातडीने व मोठ्या प्रमाणामध्ये केल्याचे शहरांमध्ये व उपनगरामध्ये दिसून येत आहे. आमदार समाधान आवताडे यांच्या कामाचा धडाका पाहून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. भाजपामधीलच मान्यवर म्हणून फिरणारे नेते आजच्या घडीला वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्नामध्ये असल्याचे दिसून येत आहे ."खोबरे तिकडे चांगभले" अशा वृत्तीच्या नेत्यांना जनता बाजूला सारल्याशिवाय राहणार नाही हेही तेवढेच खरे आहे. 
    आमदार समाधान आवताडे यांचे गत विधानसभेचे विरोधक भगीरथ भालके हे अद्यापही विधानसभेच्या निवडणुकीसाठी सक्रिय असल्याचे दिसून येत नाही. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे उमेदवारी मागणीच्या प्रयत्नात असलेले भगीरथ उमेदवारी मिळेल की नाही? अशी शंका संपूर्ण पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनतेमध्ये आहे. कारण गेल्या पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर भगीरथ भालके यांची राजकारणातील सक्रियता मतदार संघामध्ये  कुठेच दिसून आलेली नाही. आपल्या धरसोड वृत्तीमुळे भगीरथ यांनी राष्ट्रवादी सोडून तेलंगणातील बी आर एस या पक्षाकडे देखील त्यांनी आपली उपस्थिती दाखवून पुन्हा माघारी फिरल्याची घटना अद्यापही मतदारसंघातील जनता विसरली नाही. आता ते पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे उमेदवारी मागत आहेत. भगीरथ भालके यांचा जनसंपर्क कमी झाल्यामुळे त्यांना गत विधानसभेला निवडणुकीमध्ये मिळालेले मतदान घटणार असल्याचे सद्यस्थितीला चित्र दिसून येत आहे. 
     आमदार समाधान आवताडे हे लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर पासून ते आपल्या मतदारसंघांमध्ये सक्रिय राहून लोकांची कामे करीत लोकांचा संपर्क वाढवत त्यांनी "आपण कमी बोलतो परंतु कामे जास्त करून दाखवतो"  ही त्यांची कार्यशैली आता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मतदारांनी ओळखली आहे. विकास कामे व अन्य कामे सांगा असे आवर्जून सांगणारे समाधान दादा अवताडे जनतेच्या गळ्यातील ताईत बनल्याची चित्र दिसू लागले आहे. आपल्या मतदारसंघांमधील अडीअडचणी शासन दरबारी सोडवण्यात व विकास कामे पूर्ण करण्यात त्याचप्रमाणे त्या विकास कामाला लागणारा निधी हा कोणत्याही शासनाच्या काळात  खेचून आणणारे नेतृत्व अशी ओळख सध्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. 
     लोकसभेच्या निवडणुकीनंतर समाधाना अवताडे यांनी आपल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये सर्वसामान्य जनतेला भेटण्याचा व त्यांची कामे करण्याचा प्रयत्न समाधान दादा अवताडे हे करीत असल्याचे दिसून येत आहे.
     पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील वाड्या वस्त्या वर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.प्रत्येक गावातील लोकांना भेटून गावातील प्रलंबित असलेल्या कामांची माहिती घेऊन ती कामे मार्गी लावत आहेत.समाधान अवताडे यांनी या जनसंपर्काच्या माध्यमातून आपले पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पाय घट्ट रोवण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....