"जनतेचा लाडका आमदार म्हणून समाधान आवताडे यांची क्रेझ वाढतेय "

 


पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील भाजपचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या पोटनिवडणुकीमधील विजयानंतर त्यांना कार्य करण्यासाठी मिळालेल्या दोन तीन वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये त्यांनी मंगळवेढा पंढरपूर मतदार संघातील विकास कामे तसेच रस्ते, समाज मंदिर, मंगळवेढा तालुक्यातील 24 गावाचा पाणी प्रश्न, पंढरपूर शहरातील, उपनगरातील असंख्य रस्ते दुरुस्ती त्याचप्रमाणे विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी आपल्या कार्याची झलक पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेला दाखवलेली आहे.‌ तीर्थक्षेत्र आराखड्यातील विकास कामे साठी लागणारा कोट्यावधीचा निधी हा आमदार आवताडे यांनी खेचून आणलेला आहे. सतत लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व कामे करण्याचा आमदार अवताडे यांचा जोश पाहून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता त्यांना लाडका आमदार म्हणू लागले आहेत. मध्यंतरी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्व गावांमधून भाजपा सरकारने केलेले कामाची माहिती व आपण स्वतः केलेल्या कामाची माहिती व  आणलेला निधी आपण केलेली विकास कामे हे जनतेच्या समोर त्याने मांडले आहेत. सर्व सामान्य जनता आजपर्यंत झालेल्या अनेक माजी आमदाराच्या नंतर मतदार संघातील असंख्य कामे करणारा आमदार म्हणून त्यांची ओळख आज या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये झालेली आहे. शासनाने सुरू केलेल्या असंख्य जनकल्याणकारी योजना या योजनेचा पाठपुरावा करून सर्वसामान्य जनतेला या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. लाडकी बहीण योजना ही अतिशय चांगल्या पद्धतीने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये राबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आमदार समाधान दादा अवताडे यांच्या या अल्पावधीत कार्यकाळामध्ये त्यांनी जनतेचे असंख्य कामे केलेले आहेत. आमदार समाधान आवताडे यांची ओळख आज रोजी कमी बोलणारा परंतु जनतेचे कामे जास्तीत जास्त प्रमाण करणारा अशी ओळख सध्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये त्यांची झालेली आहे, म्हणूनच सर्वसामान्य जनतेच्या मनातील लाडका आमदार अशी त्यांची ओळख पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये सध्या होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....