"उमेश परिचारक यांना माढा मतदारसंघात लोक ओळखत नाहीत." जनतेशी थेट संवाद....
पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा मतदार संघ हा पंढरपूर तालुक्यातील 40 ते 45 गावाचा समावेश होऊन हा माढा विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे. या मतदारसंघातील सद्यस्थितीतील आमदार बबनदादा शिंदे हे असून गेली पाच ते सहा विधानसभेची टर्म आमदार म्हणून प्रतिनिधी करतात ,परंतु आमदार बबनदादा शिंदे यांनी येणारी विधानसभा ही आपण लढवणार नाही. आपल्या मुलाला येत्या निवडणुकीमध्ये आमदारकीसाठी संधी द्यावी.असे आवाहन केल्यामुळे या माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये असंख्य उमेदवार आमदारकीच्या निवडणुकीसाठी रिंगणामध्ये उतरलेले सद्यस्थितीला दिसून येत आहे.
पंढरपूर तालुक्यातील कित्येक गावे माढा विधानसभेला जोडलेला आहे. पंढरपूर तालुक्यातील परिचारक कुटुंबातील किंग मेकर म्हणून ओळखले जाणारे तसेच पांडुरंग परिवाराचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे उमेश परिचारक हे या माढा मतदार संघामधून आपली उमेदवारी जाहीर करावी म्हणून पांडुरंग परिवार व परिचारक प्रेमी परिवार यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून उमेश परिचारक यांनी उमेदवारी जाहीर करून माढा विधानसभा लढवावी अशी इच्छा परिचारक यांच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच व्यक्त केली .
परंतु माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये आमच्या प्रतिनिधीने थेट मतदारांशी जनसंवाद केला असता या मतदारसंघातील कित्येक लोक उमेश परिचारक यांना ओळखत देखील नाहीत .त्याचप्रमाणे हे नाव आम्ही पहिल्यांदाच ऐकत आहोत असे देखील कित्येक मतदारांनी सांगितले. परिचारक हे निवडणुकीच्या गर्दीमधील एक नाव असून या नावाची जादू पंढरपूर मंगळवेढा मतदार संघामध्ये चालत असेल परंतु आमच्या माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेश परिचारक यांना कोणी ओळखत देखील नाही. अशी प्रतिक्रिया कित्येक लोकांनी व्यक्त केली.
उमेश परिचारक यांनी आज पर्यंत माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये कसलाही जनसंपर्क केलेला नाही मग ते ऐनवेळी इच्छुक असलेले उमेदवार म्हणूनच त्यांची ओळख निर्माण होत आहे. माढा मतदार संघातील सर्वसामान्य जनता ही आपला माढा विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी निवडण्याच्या बाबतीत सतर्क व सजग असल्याचे दिसून आले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा