डॉ. निकम यांच्या ट्युलिप सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले मोफत जन आरोग्यदायी योजना त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना या योजनेचे उद्घाटन आमदार समाधान दादा अवताडे यांच्या हस्ते झाले.


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर येथील सुप्रसिद्ध डॉ निकम यांचे ट्यूलिप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे राज्य शासन यांचे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य मोफत योजना त्याचप्रमाणे केंद्र शासनाचे आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य मोफत योजना या दोन्ही योजनेचे शुभारंभ  ट्युलिप हॉस्पिटल या डॉ निकम यांच्या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब बांधवांसाठी मोफत उपचार केले जाणार आहेत. 

     आज रोजी या महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या मोफत आयोग आरोग्यदायी योजनेचे आमदार समाधान दादा अवताडे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंढरपूर शहर व तालुक्यातील त्याचप्रमाणे आजूबाजूच्या अन्य तालुक्यामधील गोरगरीब जनतेचे आरोग्यविषयक तपासणी या मोफत करण्यात आले. या मोफत शिबिराला सर्वसामान्य जनतेमधून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

    डॉक्टर निकम यांच्या ट्युलिप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये सर्व रोगावरील उपचार हे केले जातात. या ठिकाणी हृदयरोग, मेंदू विकार ,अस्थिरोग त्याचप्रमाणे पोटाचे विकार त्वचा विकार ,प्लॅस्टिक सर्जरी सांधेदुखी सांधेरोपनअसे अनेक रोगांच्यावर उपचार केले जातात. आता हे उपचार महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी मोफत योजनेमध्ये त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत जन आरोग्य मोफत योजनेमध्ये हे उपचार केले जाणार आहेत. याची माहिती आमदार समाधान दादा अवताडे यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे डॉक्टर निकम यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी या ठिकाणी उपचार हे मोफत केले जाणार आहेत. अशी त्यांनी माहिती दिली. 

    यापूर्वी डॉक्टर निकम यांच्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध मोफत आरोग्य तपासणीचे शिबिर आयोजित केलेले आहे. या शिबिरामधून असंख्य लोकांनी मोफत तपासणीचा लाभ घेतलेला आहे. सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी डॉक्टर निकम यांनी हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे आरोग्य सेवा करण्याची त्यांचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले गेले.

    या मोफत आरोग्य शिबिराच्या प्रसंगी व आयुष्यमान भारत त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी मोफत योजना या दोन्ही योजनेच्या उद्घाटन प्रसंगी पंढरपूर शहरातील असंख्य मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार समाधान दादा अवताडे यांच्यासोबत पंढरपूर मर्चंट बँकेचे संचालक अमरजीत पाटील, संभाजी ब्रिगेडचे दीपक दादा वाडदेकर, माजी नगराध्यक्ष उज्वला भालेराव, माजी नगराध्यक्ष सुभाष दादा भोसले आधी असंख्य मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....