"राजकारणी लोकांनीच राजकीय स्तर खालवला आहे" .....असे वाटत नाही का?.


 पंढरपूर (  प्रतिनिधी) 1990 नंतर राजकारणामध्ये बदल होत चालल्याचा आपल्याला दिसून येत आहे. तत्पूर्वी राजकारणामधील राजकीय नेते मंडळी हे सर्वसामान्य जनतेचे हित, त्याचप्रमाणे लोक काय म्हणतील? समाज काय म्हणेल? या सामाजिक संकेताला हे नेते मंडळी घाबरून होती. आपण दिलेले आश्वासन आपण जर पूर्ण करू शकलो नाही. तर लोक काय म्हणतील? याची भीती या राजकारणी नेते मंडळींना होती. परंतु जसजसे काळ पुढे जात राहिला त्याप्रमाणे समाजकारण, राजकारण यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत चाललेला आपण पाहत आलो आहोत. 

     90 च्या दशकाच्या अगोदर कुठलीही निवडणूक असली तरी या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यामध्ये गावातील तसेच शहरातील त्याचप्रमाणे प्रत्येक गल्ली आणि प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना, त्याचप्रमाणे तरुणांना या येत्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर कोणकोणती कामे करायचे आहेत. किंवा करणार आहोत याची माहिती देण्यासाठी हे नेतेमंडळी घरोघरी, गल्लोगल्ली व वाड्यावर जात असे. तेथील मतदारांच्या अपेक्षा त्यांची कामे ही काय आहेत. याची माहिती घेऊन व त्याप्रमाणे शासन दरबारी ही कामे केली जात असे. आणि सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेऊन आपण ज्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणार आहे. त्या पक्षाचे ध्येय धोरण, जाहीरनामा व त्या पक्षातील ज्येष्ठ मान्यवर नेते यांचे चारित्र्य व व्यवहार ही कसे चांगले आहे. याची देखील खात्री व माहिती सर्व सामान्य जनतेला दिली जात असे. ज्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहोत. त्या पक्षाची आजपर्यंत केलेली कामे, दिलेली आश्वासने व त्या आश्वासनाची पूर्ती झाली किंवा कसे याची देखील सखोल चर्चा मतदारांशी केली जात असे. 

    सद्यस्थितीला राजकीय मंडळी कुठल्याही प्रकारे आपण निवडणूक लढवायचे व ती  जिंकायची हेच धोरण हे राजकारणी मंडळी ठरवू लागल्यामुळे मग या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी साम दाम दंड भेद ही सर्व अस्त्रे वापरली जाऊ लागली .या साम-दाम दंडाच्या पलीकडे देखील सर्वसामान्यांची जवळीकता ही महत्त्वाची असते. हीच गोष्ट या सद्यस्थितीतील राजकारणी मंडळी विसरून गेली की काय? अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे. निवडणूक निवडून येण्यासाठी वारे माप खर्च केला जाऊ लागला. वाड्या वस्तीवर, शहरातील वार्डामधून आर्थिक देणे घेणे सुरू झाले. त्याचप्रमाणे मतदारांना खुश करण्यासाठी वेगवेगळ्या ढाब्यावर हॉटेलमधून खानपान मदिरा व अन्य प्रलोभने दाखवून व देऊन ही निवडणूक लढवली जाऊ लागली. याचा प्रत्यय आता सर्वसामान्य जनतेला येऊ लागलेला आहे. सर्वसामान्य जनता अशा प्रलोभनाला फसली जात आहे. हेही तेवढेच सत्य आहे. 

     राजकारणी मंडळी निवडणूक जिंकून झाल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून हे शासन दरबारी दाखल होतात आणि विकास कामे करण्याच्या माध्यमातून ठेकेदार व आपली बगलबच्चे नातेवाईक मित्रमंडळी अशा जवळच्या लोकांनाच ही विकासाची कामे दिली जाऊ लागली. या कामाच्या माध्यमातून ठेकेदार बगलबच्चे नातेवाईक हे मोठे होऊ लागले. कामाचा स्तर हा ढासळू लागला. उत्कृष्ट प्रतीचे रस्ते गटारी अन्य मूलभूत सुविधा या कुठल्याही न्याय स्तरावर या टिकणार नाहीत असा हलक्या दर्जाची कामे या बगलबच्चांकडून होऊ लागली आणि त्याकडे दुर्लक्ष करणारे हेच ते राजकारणी लोक या माध्यमातून झालेला निवडणुकीतील खर्च हा कसा गोळा करायचा याच्याच ध्यासापोटी मग विकास कामे च्या नावाखाली भ्रष्टाचार हा त्याच्यासोबत आलाच म्हणून समजा. अशा पद्धतीचे कामे जर होत राहिली तर सर्वसामान्यांचा कर रूपाने जमा झालेला हा पैसा असाच हा या राजकारणी लोकांच्या खिशामध्ये जात असल्याचे आपण पाहत आहोत. 

     सद्यस्थितीला राजकारणाचा स्तर हा खालवला आहे असे काही नेतेमंडळी म्हणू लागली आहेत. परंतु हा राजकीय स्तर एवढ्या खालच्या दर्जाला गेला कसा? याचे आत्मपरीक्षण का केले जात नाही? असा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर हे राजकारणी मंडळी देण्याचे टाळतात. या राजकारणी लोकांमुळेच समाजातील व राजकारणातील स्तर हा खालावत चाललेला आहे. ज्याप्रमाणे हे राजकारणी जेवढे जबाबदार आहेत तेवढीच जबाबदार सर्वसामान्य जनता देखील आहे. या सर्वसामान्य जनतेने या राजकारण्यांवर निवडणुकीच्या माध्यमातून अंकुश ठेवला असता तर या राजकारणी लोकांवर एक प्रकारे सर्वसामान्य जनतेची मतदारांचा वचक बसला असता. जर अशा भ्रष्ट राजकारणी लोकांना बाजूला करायचा असेल तर निवडणुकीच्या माध्यमातून अशा लोकांना बाजूला सारण्याचे काम हे सर्वसामान्य जनतेचे आहे. हेही देखील तेवढेच खरे आहे सर्वसामान्य जनतेने विचारपूर्वक मतदान करावे व योग्य तो नेता निवडावा अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा असते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....