"शेतकऱ्यांच्या व बेरोजगारांच्या हिताची भूमिका घेणाऱ्याला निवडून देणार"..माढा मतदारांची स्पष्ट भूमिका


 पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये जनमत चाचणी आणि मतदार राजाची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असलेली स्पष्ट भूमिका काय आहे.या विषयी चाचपणी केली असता या माढा मतदार संघामधून धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

    माढा मतदार संघातील आमदार बबनदादा शिंदे यांनी गेली तीस वर्षे एकहाती सत्ता असूनसुद्धा काही गावातील समस्या या मिटल्या नाहीत.पाणी शेजारील गावांना येते परंतु काही गावे पाण्या पासून वंचीत ठेवल्याचे लोक उघडपणे व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे.ग्रामिण भागातील रस्ते ही दुरुस्तीसाठी वाट पहात आहेत.

ठेकेदार पोसण्याचे काम सत्ताधारी मंंडळीने केल्याचे देखील बोलले जात आहे. शेतकऱ्यांच्या अंगावर कर्ज काढून त्यांना कर्जाच्या खाईत लोटले आहे.असा आरोप देखील मतदार करीत आहेत.

    सत्ताधारी मंडळींकडे साखर कारखाने असून या भागातील शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर दिला जात नाही.पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा अभिजीत आबा पाटील यांच्या ताब्यात असून या कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी ३५०० रुपये चा दर जाहीर केला आहे.या कारखान्याची तुलना माढा तालुक्यातील साखर कारखाने शी केली जात आहे.आमच्या ऊसाला जो चांगला दर देईल त्या व्यक्तीला आम्ही मतदान करु कशी भूमिका माढा तालुक्यातील मतदार घेत असल्याचे दिसून येत आहे.

    गेली पस्तीस वर्षे एकहाती सत्ता असूनसुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न,पाणी प्रश्न, रस्ते विकास,अशी असंख्य कामे प्रलंबित आहेत.आणि पुन्हा एकदा या विधानसभेला मुलाला निवडून द्या अशी विनंती केली जात आहे.परंतू सर्वसामान्य मतदारांना " बदल " हवा आहे.

   पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी या माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध सामाजिक उपक्रमांमधून व गाव भेटीच्या माध्यमातून आपला संपर्क वाढवत असल्याचे दिसून येत आहे.सर्वसामान्य मतदारांचे जनमत हे अभिजीत आबा पाटील यांच्या दिशेने जात असल्याचे दिसून येत आहे.

   पाहूया माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये काय चमत्कार घडतो आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....