"उद्या मनसेच्या वतीने कुस्तीची दंगल". विधानसभेला " मनसे" आता "दिलसे "उतरणार.
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षाच्या वतीने येणारी विधानसभा लढवली जाणार आहे.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी मनसेचे उमेदवार म्हणून दिलीप बापू धोत्रे यांची सर्वप्रथम उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर झालेली आहे. गेल्या दोन दशकापासून मनसेचे सोलापूर जिल्ह्याचे नेते दिलीप बापू धोत्रे विविध समाजोपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी धडपडणारे एक युवा नेतृत्व म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. कोरोना कालावधीमध्ये असंख्य कुटुंबांना आधार देणारे व्यक्तिमत्व म्हणून दिलीप बापू धोत्रे यांची ओळख संपूर्ण पंढरपूर शहर व तालुक्याला झालेली आहे. दिलीप बापू धोत्रे यांनी आपल्या आजपर्यंतच्या कार्याला सर्वसामान्य जनता ही प्रतिसाद देणार आहे असा त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील युवा कुस्तीप्रेमी व व्यायाम प्रेमी यांना एक प्रकारे प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने व पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील युवकांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी म्हणून दिलीप बापू धोत्रे यांनी मंगळवेढा या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल या भल्या मोठ्या मैदानामध्ये महाराष्ट्र राज्यस्तरीय कुस्तीचे आयोजन केले आहे. मनसे केसरी या कुस्तीमध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमी व कुस्तीगीर हे सामील होणार आहेत.
अनेक मान्यवर कुस्ती गिरांच्या कुस्ती होणार असून या कुस्तीच्या लढतीचा आनंद सर्वांनी घ्यावा. असे आवाहन मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आज रोजी केले.
येणारी विधानसभा ही निवडणूक मनसे आता दिलसे लढणार आहे एवढे मात्र निश्चित.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा