" मनसेच्या वतीने महाराष्ट्र केसरी कुस्ती चे आयोजन " ... दिलिप बापू धोत्रे.मनसे नेते
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे मनसेचे नेते दिलिप बापू धोत्रे यांनी मंगळवेढा येथे दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र केसरीच्या कुस्तीचे आयोजन केले आहे.
या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मनसेचे नेते अमीत राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या कुस्ती स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रामधील मल्ल हे सहभागी होणार आहेत.
या कुस्ती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मल्लांना शंभर रुपये पासून ते पाच लाख रुपये पर्यंत चे बक्षिसे देण्यात येणार असल्याचे सोलापूर जिल्हा मनसेचे नेते दिलिप बापू धोत्रे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागातील तालमींना आर्थिक निधी म्हणून मदत करण्याचे मनसे चा मनोदय आहे राज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच या तालमींना दुरुस्तीसाठी व तेथील वस्तू व साहित्यांना आर्थिक निधी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
या पत्रकार परिषदेस उपस्थित मनसेचे मान्यवर शशिकांत पाटील महाराष्ट्र केसरी समाधान घोडके माजी नगरसेवक मोहम्मद वस्ताद अरुण कोळी आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा