"तन्मय जाधव यांनी मिळवले एस.एस सी.मध्ये.98.60.टक्के मार्क" बी.एफ.दमाणी विद्यामंदिर च्या नावलौकिकात मानाचा तुरा...


 पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकताच शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला. सोलापूर येथील बी एफ दमानी विद्यामंदिर येथील विद्यार्थी चि. तन्मय बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्यांनी एसएससी परीक्षेमध्ये 98.60 इतके मार्क घेऊन बी एफ दमाणी विद्यामंदिर सोलापूर या शाळेच्या नावलौकिकामध्ये मानाचा तुरा त्यांनी रोवला. 
   तन्मय बाळासाहेब जाधव हा विद्यार्थी या शाळेमध्ये इयत्ता पहिल्या वर्गापासून अग्रक्रमांक मिळवत असलेला हा विद्यार्थी त्यांनी बी एफ दमाणी शाळेतील शिक्षकांच्या कष्टाचे व त्यांच्या मार्गदर्शनाचे चीज केले. तन्मय जाधव याला शाळेतील मुख्याध्यापक तसेच त्याचे सर्व विषयाचे शिक्षकांनी योग्य ते मार्गदर्शन केल्यामुळेच व अभ्यासामध्ये सातत्य राखल्यामुळे हे त्याला यश मिळवता आले. असे तन्मय बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्यांनी आज आमच्या प्रतिनिधीला सांगितले. 
    तन्मय ची आई या  शिक्षिका असून तन्मय चे वडील बाळासाहेब जाधव हे देखील प्राथमिक शिक्षक होते. त्यांचे दुःखद निधन कोरोना कालावधीमध्ये कोरोना रुग्णाची सेवा करत असतानाच त्यांचे कोरोना या आजारामुळे दुःखद निधन झाले. अतिशय लहान वयामध्ये पितृछत्र हरपल्यामुळे तन्मय जाधव ची आई श्रीमती संध्या बाळासाहेब जाधव यांनी आपले सर्व दुःख बाजूला ठेवून तन्मय याची शैक्षणिक प्रगती कशी होत जाईल. याकडे लक्ष दिल्यामुळे त्यांनी आज हे यश प्राप्त केले आहे. 
     तन्मय बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्याचे बीएफ दमानी विद्यामंदिर सोलापूर या ठिकाणी त्याचा सत्कार करून व पुढील शैक्षणिक वाटचालीस सर्व शिक्षक वर्गानी त्याला शुभेच्छा दिल्या. पितृछत्र हरपल्यानंतर देखील नैराश्याला बाजूला करून मोठ्या जिद्दीने तन्मय बाळासाहेब जाधव यांनी एसएससी चा अभ्यास करून त्यांनी हे यश प्राप्त केले आहे. त्याचे कौतुक सर्वत्र होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "