"भाजपाला फटका अन् देवेंद्र ला झटका बसतोय की काय?"....... मराठा,धनगर समाजाची नाराजी भोवणार


 पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकतेच माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये देशाच्या पंतप्रधानांची सभा झाली. या सभेच्या वेळी देशाच्या प्रथम नागरिकांनी माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये येऊन या मतदार संघातील जनतेला भावनिक आव्हान करण्याचे प्रयत्न केला. येळकोट येळकोट जय मल्हार आणि बाळूमामाच्या नावानं चांगभलं असे भावनिक आव्हान करून त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील मराठा व धनगर समाजाला आपलंस  करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 

     भाजपा सरकारने मराठा समाज त्याचप्रमाणे धनगर समाज हे दोन्ही समाज ज्या आरक्षणासाठी ते कित्येक वर्षापासून धडपडत आहेत. परंतु या दोन्ही समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचे काम या सरकारने राजकीय सोयीनुसार त्यांनी दूर ठेवलेले आहे. फक्त राजकीय फायदा घेण्याच्या उद्देशाने या मराठा व धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून त्यांनी झुलवत ठेवलेले आहे. असे मनोगत माढा लोकसभा मतदारसंघातील जनसंवादाच्या माध्यमातून मतदारांनी आमच्याशी व्यक्त केले. 

       माढा येथील याच जाहीर सभेमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील विरोधी पक्षाचे उमेदवार  धैर्यशील मोहिते पाटील व त्यांच्या मोहिते पाटील परिवारावर सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी माळशिरस तालुक्यात व माढा मतदारसंघांमध्ये मोहिते परिवारांची दादागिरी आहे. येथे लोकशाहीचे राज्य नाही येथे फक्त ठोकशाही चालते. आता यापुढे मोहिते पाटील परिवारांची दहशत मोडून काढणार. अशी जहरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी या सभेमधून केली. या देवेंद्र फडणवीस यांच्या टीके विषयी जनसंवाद साधला असता लोकांच्या भावना व्यक्त झाल्या. मोहिते पाटील परिवारांनी गेली कित्येक वर्षापासून या परिसरातील जनतेचे भले करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी यांच्यासाठी त्यांनी असंख्य कामे केलेले आहेत. या परिसरामध्ये राहणारे सर्व जनता ही आपला परिवार आहे. असे समजून त्यांनी आपले ऋणानुबंध या संपूर्ण लोकसभा मतदारसंघांमध्ये ठेवलेले आहेत. असे असताना मोहिते पाटील   यांची दहशत कुठे आहे?  असा देखील सवाल या जनसंवादातून जनता व्यक्त करीत होती. सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे, उद्योगधंदे करणारे व्यापाऱ्यांचे असंख्य प्रश्न मोहिते पाटील परिवारांच्याकडे गेल्यानंतर लगेच मार्गी लागतात. अशी भावना देखील या जनसंवादामधून ऐकायला मिळाली. 

      माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये धनगर समाज त्याचप्रमाणे मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या दोन्ही समाजातील लोकांच्या भावना या तीव्र आहेत. धनगर समाज हा गेल्या कित्येक वर्षापासून भाजपाच्या पाठीशी उभे असलेला आपल्याला दिसून आलेला आहे. या धनगर समाजाच्या आरक्षणाला भाजपाने कधीही पाठिंबा दिलेला नाही. फक्त आश्वासन देण्याची त्यांनी काम केलेले आहे. या भागातील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर हे गेल्या 30-35 वर्षांपासून भाजपचे कार्यकर्ते आहेत. परंतु या कार्यकर्त्याला मोठे करण्याचे काम भाजपाने कधीही केलेले नाही. त्यामुळे या भागातील सर्वसामान्य धनगर समाज हा भाजपावर नाराज असल्याचा दिसून येत आहे.धनगर समाजातील लोकांशी संपर्क साधला असता त्यांच्या भावना त्याने व्यक्त केल्या. 

    याच माढा लोकसभा मतदारसंघातील मराठा समाज, हा समाज संपूर्ण करमाळा,माढा, माळशिरस ,सांगोला ,फलटण पंढरपूर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. या समाजाची भावना समजून घेण्याच्या उद्देशाने या समाजातील लोकांना भेटले असता त्यांनी भाजपाने व त्यांच्या सहयोगी पक्षाने आम्हाला फसवलेले आहे. मराठा समाजातील उपोषणकर्त्या महिलांवर व ज्येष्ठ नागरिकांवर बेछूट काठीमार व गोळीबार केल्यामुळे हा मराठा समाज पूर्णता भाजपाच्या विरोधात मतदान करणार असल्याचे या समाजातील लोकांची जनसंवाद साधले असता त्यांनी आपले मत व्यक्त केले. 

      माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विषयी असलेली नाराजी ही सर्व समाजामधून पहावयास मिळत आहे. यामुळे या "माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपा च्या उमेदवाराला फटका बसणार आणि देवेंद्र फडणवीस यांना झटका बसणार"  असे माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदार आपल्या जनसंवादामधून आपल्या भावना व्यक्त करीत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....