"माझा संसार बळकट झाला आहे,आता मोदी सरकारच्या माध्यमातून जनतेचा संसार बळकट करायचा आहे.".. समाधान आवताडे
पंढरपूर ( प्रतिनिधी) आपल्या देशातील लोकसभेची ही निवडणूक ही देशातील सर्वोच्च अशी निवडणूक आहे. ही निवडणूक म्हणजे ग्रामपंचायतची किंवा नगरपालिकेची, जिल्हा परिषद ची अशी ही निवडणूक नसून ही निवडणुक देशामध्ये स्थिर सरकार, त्याचप्रमाणे देशाची जर का प्रगती करायचे असेल, देश सुरक्षित ठेवायचा असेल तर लोकशाही पद्धतीने चांगले सरकार निवडून देण्याची ही प्रक्रिया आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये भाजपा सरकारने देशांमध्ये स्थिर असे शासन दिलेले आहे. मोदी सरकारच्या कालावधीमध्ये असंख्य कल्याणकारी योजना या राबविण्यात आलेल्या आहेत. त्या सर्व योजना म्हणजे महिलांसाठी उज्वला गॅस, सर्वसामान्य जनतेला मोफत राशन, त्याचप्रमाणे ज्यांना घरे नाहीत त्या गरीब बेघरांना घरकुल दिलेला आहे. वैद्यकीय सुविधा मोफत त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. प्रत्येक गावामध्ये विजेची सोय केलेली आहे. रस्ते आणि पाणी हे गावोगावी वाड्यावस्ती वर त्यांनी आणलेले आहे. हे सर्व कार्य भाजप सरकारच्या राजवटीमध्ये मोदी सरकारने केलेले आहे. मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचा उमेदवार एक प्रतिनिधी म्हणून राम सातपुते यांना आपण सर्वांनी निवडून द्यायचा आहे. असे आवाहन मग पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार समाधान आवताडे यांनी केले.
भाजपा सरकारने सर्वसामान्य जनतेचे कल्याण व त्यांना आर्थिक सुबत्ता लाभावी म्हणून प्रयत्न केले आहेत. "आजच्या घडीला माझा संसार बळकट झालेला आहे ,आता मोदी सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुणांचे संसार हे बळकट करायचे आहे".
मंगळवेढा तालुक्याला भेडसावणारा पाणी प्रश्न हा आता सुटणार आहे. 24 गावचा पाणी प्रश्न त्या पाणी योजनेला मंजुरी मिळाली आहे. त्या कामाचे टेंडर निघालेले आहे. त्यामुळे या 24 गावांना चांगल्या प्रकारे पिण्याचे पाणी व शेतीला उपलब्ध होणारे पाणी हे आपल्याला मिळणार आहे. हे सर्व महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे कार्य केलेले आहे. याचा देखील त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
गोणेवाडी गावी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश्वर मासाळ यांनी सहयोगी पक्ष म्हणून भाजपाला पाठिंबा दर्शवला आहे. त्याचप्रमाणे गोणेवाडी या गावांमध्ये घोंगडी बैठक आयोजित करून या गावातील मतदार भाजपला मतदान करणार आहे असे त्यांनी सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा