"धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीने भाजपाला चांगले पळवले आहे ". शरद पवार


 पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीने चांगलेच पळवले आहे. गेली पाच वर्ष सत्तेची खुर्ची उबवत बसलेल्या या भाजपाच्या उमेदवाराला धैर्यशील पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून भाजपाच्या उमेदवाराची धावपळ सुरू झाल्याची दिसून येत आहे .परंतु या माढा लोकसभा मतदारसंघातील पाण्याने त्रस्त असलेला शेतकरी ,बेरोजगार तरुण हा या भाजपाच्या उमेदवाराला ज्वलंत प्रश्न विचारून अक्षरशा हैराण करीत आहे. 

     मोदी सरकार हे काही मोजक्या कारखानदारांसाठी व त्यांच्या समूहासाठी काम करीत आहेत. महाराष्ट्रातील असंख्य उद्योगधंदे त्यांनी गुजरात या राज्यात नेले आहेत. देशाचा पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा असतो. परंतु या मोदी सरकारने काही विशिष्ट लोकांनाच खुश करण्याचे काम केले आहे.

    पंतप्रधान मोदी हे आपल्या भाषणामधून वारंवार म्हणत आहेत हे विरोधक लोक महिलांचे मंगळसूत्र हिसकावून घेणार आहेत, त्यांच्या संपत्ती जप्त करणार आहेत. असे बोलून ते सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करीत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून कारखानदारांना धमकी दिल्या जात आहेत. हे योग्य नाही असे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज येथे आपले मत व्यक्त केले.

    मी संरक्षण मंत्री असताना देशभरामध्ये संरक्षण यंत्रसामग्रीचे कारखाने सुरू करून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्याचप्रमाणे कृषी मंत्री असताना आपल्या देशातील शेतकऱ्याचा शेतमालाला  निर्यातीच्या माध्यमातून परदेशात पाठवून आपल्या भारतातील शेतकऱ्यांना चांगला भाव देण्याचा आम्ही यावेळी प्रयत्न केला आहे .परंतु आज निर्यात बंदी ही लागू करून आपल्या शेतकऱ्यांचा माल हा उत्कृष्ट प्रतीचा असून देखील तो पाश्चिमात्य देशांमध्ये विकला जाऊ शकत नाही. त्याचे कारण म्हणजे निर्यात बंदी आहे. आपल्या देशातील  उत्कृष्ट पद्धतीचे पिके, फळे यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चांगला दर मिळत असतो. भाजपाने निर्यात बंदी लागू करून शेतकऱ्यांचे कंबरड मोडण्याचे काम केले आहे . सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या भाजपा सरकारला उद्याच्या सात तारखेला मतदार बंधू-भगिनींने खड्यासारखे बाजूला करून धैर्यशील मोहिते पाटील यांना प्रचंड मताने आपण निवडून द्याल याची मला खात्री आहे. असे शरद पवार यांनी आपल्या जाहीर सभेमध्ये  आपले मनोगत व्यक्त केले. 

 या हजारोच्या संख्येने असलेल्या प्रचार सभेस महाराष्ट्रातील विविध पक्षाचे मान्यवर नेतेमंडळी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....