"बारामती येथे चंद्रकांत पाटील यांच्या मुळे मतदान कमी"


 पंढरपूर.(प्रतिनिधी) भाजपा मधील ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक पूर्वी शरद पवार यांच्या बाबतीत केलेले वक्तव्य ते म्हणजे "शरद पवारांचे बारामतीतील राजकीय अस्तित्व संपवणार" या त्यांच्या वक्तव्यामुळे बारामती परिसरातील शरद पवार प्रेमी तसेच अन्य सामाजिक संघटना हे नाराज झाल्याचे दिसून येत आहे. 

      सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यामध्ये सांगोला त्याचप्रमाणे टेंभुर्णी या ठिकाणी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या कार्याला अडचणीचे ठरले होते. टेंभुर्णी येथील सर्वसामान्य मतदाराला त्यांनी "तू कोणता पक्षाचा आहे?" म्हणून विचारणा करून त्या शेतकऱ्याच्या प्रश्नांची केलेली  हेटाळणी व त्यामुळे नाराज झालेले कार्यकर्ते व मतदार आणि त्या घटनेनंतर सांगोला येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये त्यांनी "सोलापुरातील लोकसभा मतदारसंघातील दोन्ही जागा माढा व सोलापूर या भाजपाच्या हातून निसटतात की काय तसेच दोन्ही जागा या धोक्याच्या स्थितीत आहेत." असे वक्तव्य केले होते. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये व नेत्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ, तळागाळातील सर्वसामान्यांच्या अडचणी जाणणारा हा नेता म्हणून ओळखला जातो चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला तेवढेच महत्व प्राप्त झाले होते. 

     "आता बारामती येथील शरद  पवारांचे अस्तित्व संपवणार" असे वक्तव्य केल्यामुळे या परिसरातील सर्वसामान्य जनता सामाजिक संघटना शरद पवार प्रेमी लोक आपली नाराजी व्यक्त करीत असताना दिसून येत होते. त्याचा परिणाम म्हणून मतदान कमी झाले की काय?  अशी चर्चा बारामती मतदारसंघांमध्ये आज सुरू झालेली आहे. 

    मध्यंतरी सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सोलापूर व माढा येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये त्यांनी शरद पवार यांचा नामोल्लेख न करता भटकती आत्मा असे म्हणून टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून शरद पवारांनी देखील उत्तर दिले होते " शेतकऱ्यांसाठी माझा आत्मा भटकतोय, त्यांच्या कल्याणासाठी माझा आत्मा भटकतोय आहे" असे त्यांनी वक्तव्य केले होते. या सर्व भाजपाच्या ज्येष्ठ नेते मंडळीच्या भाषणातून प्रचार सभेमध्ये शरद पवारांच्या वर झालेली टीका ही भाजपाच्या उमेदवारांना विजयी ठरण्याच्या उद्देशाने अडचणीचे ठरते की काय? अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. 

    चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे व पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या या शब्द प्रयोगामुळे महाराष्ट्रातील भाजपाच्या जागा अडचणी येतात की काय?  अशी परिस्थिती व चर्चा महाराष्ट्रामध्ये सर्वत्र सुरू आहे. 

     चंद्रकांत पाटील व पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या या टीकेमुळे सुनेत्रा पवार यांचा बारामती मतदार संघामधून पराभव होतोय की काय?  अशी शंका भल्याभल्या नेतेमंडळींना येऊ लागलेली आहे. 

येत्या चार जून रोजी चंद्रकांत पाटील व नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य भाजपाला विजयी करते. की की पराजय करते. हे पहावे लागेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....