"देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना बळ देणार".... अभिजीत पाटील


 पंढरपूर ( प्रतिनिधी) . सोलापूर लोकसभा मतदारसंघ तसेच माढा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदार संघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते तसेच रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना बळ देण्याचे उद्देशाने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी भाजपाच्या या दोन्ही उमेदवारांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. श्री विठ्ठल साखर कारखान्याचे हजारोच्या संख्येने असलेले सभासद या सभासदांच्या कल्याणासाठी व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला आर्थिक बळ प्राप्त होण्याचे आश्वासन तसेच योग्य ते मार्गदर्शन देण्याची भूमिका महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी माढा लोकसभा मतदार संघ, सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देण्याचा म्हणून निश्चय अभिजीत आबा पाटील व श्री विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक व सभासद यांनी व्यक्त केला. 

    पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा सर्वात मोठा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाना असल्यामुळे या साखर कारखान्याचे सभासद हजारोंच्या संख्येने आहेत. या कारखान्याचा जो कुणी चेअरमन असेल, हा कारखाना ज्यांच्या ताब्यात असेल त्याच्या पाठीमागे संपूर्ण सभासद व संचालक मंडळ हे एकजुटीने उभे राहतात. व चेअरमन यांना ते बळ देतात. याच उद्देशाने उद्याच्या माढा लोकसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे दोन्ही उमेदवारांना निवडून आणून देण्यासाठी या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचे योगदान लाभणार आहे.

      महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारासाठी नियोजित सभा सर्वत्र सध्या सुरू असल्यामुळे येत्या पाच तारखेला दुपारी बारा वाजता विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व सभासद व समर्थक कार्यकर्त्यांची मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आलेले आहे. याच दिवशी प्रचाराची सांगता पूर्ण होत आहे. याच दिवशी स्वतः फडणवीस येणार असल्यामुळे या सभेला फार मोठे महत्त्व येणार आहे. त्यामुळे ही शेवटची आणि विजयी सभा ठरणार असल्याचे श्री अभिजीत आबा पाटील यांनी आज रोजी सांगितले..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....