भाजपा ने आमदारकी चे गाजर दिले कुणा...कुणाला?..
पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका या पार पडल्या. सोलापूर लोकसभा मतदारसंघ तसेच माढा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील अनेक राजकीय नेत्यांना भाजपाने आमदारकीचे गाजर दाखवलेले आहे. हे या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आले.
या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील येणारे आमदार या सर्वांना त्याचप्रमाणे भावी आमदारांना आणि माजी आमदारांना भाजपाच्या ज्येष्ठ नेते मंडळींनी सक्त ताकीद व आदेश देऊन सांगितले होते. की या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताच्या फरकाने निवडून आणावे. ज्या विधानसभेच्या तालुक्यामधून जास्ती जास्त भाजपाचा उमेदवाराला मतदान अधिक मिळेल, आणि ते मताधिक्य कोण मिळवून देईल. त्या व्यक्तीला आमदारकीची तिकीट दिले जाईल. असे संकेत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्यामुळे या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील असंख्य नेते मंडळी ही भाजपाच्या दोन्ही उमेदवाराला निवडून देण्यासाठी अथक प्रयत्न त्यांनी केल्याचे दिसून येते.
ज्या विधानसभा च्या क्षेत्रामधून भाजपच्या उमेदवाराला कमी मते मिळेल. त्या भागातील आजी-माजी तसेच भावी नेतेमंडळीला तिकीट दिले जाणार नाही. असे या नेत्यामंडळीला संकेत मिळाल्यामुळे या सर्वांची खूपच अडचण झालेली आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघ त्याचप्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदार या सर्वांचा कल पाहता भाजपाच्या उमेदवाराला हा कसोटीचा काळ आहे. असे म्हणावे लागेल. दोन्ही मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये काही तालुक्यामधून भाजपाला मानणारा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याच्या उद्देशाने मतदान करणारा काही वर्ग आहे. तसेच काही लोकसभा मतदारसंघातील तालुक्यामधून भाजपाच्या शेती विषयक धोरण, बेरोजगारी विषयीचे धोरण, त्याचप्रमाणे वाढती महागाई, आणि शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे आणि पिण्याचे पाणी व शेती ला आवश्यक असलेले पाणी हे सरकार देऊ न शकल्यामुळे असलेली नाराजी ही स्पष्टपणे दिसून येत होती. हा नाराज झालेला मतदार भाजपच्या विरोधात मतदान केल्याचे काही ठिकाणी दिसून आले.
या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण, त्याचप्रमाणे धनगर आरक्षण, संविधान बचाव म्हणून आवाज उठवणारे संविधान प्रेमी लोक, या भाजपाच्या वेगवेगळ्या धोरणाला विरोध दर्शवल्याचा पहावयास मिळाले. मराठा आरक्षण हे मराठा समाजाला लागू व्हावे. म्हणून असंख्य मूक मोर्चा, निषेध मोर्चे निघाले. परंतु आरक्षणाचे गाजर हे मराठ्यांच्या हाती देऊन मराठा समाजाची नाराजी या भाजपा सरकारने केलेली आहे. त्याचप्रमाणे धनगर समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी असंख्य मोर्चे व निषेध मोर्चे काढून भाजपाला व सरकारला जेरीस आणल्याचे आपण पाहिलेले आहे. संविधान हे बदलले जाणार की काय? या भीतीपोटी आंबेडकर प्रेमी त्याचप्रमाणे संविधान प्रेमी जनतेने भाजपाला यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोध दर्शवायचा म्हणून त्यांनी भाजपच्या विरोधात मतदान केल्याचे काही ठिकाणी दिसून आले. हे सर्व पाहता आज महाराष्ट्रामध्ये असलेले भाजपा, शिवसेना शिंदे सरकार गट त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना ही लोकसभा निवडणूक ही सत्व परीक्षेची ठरणार आहे. या लोकसभेच्या परीक्षेमध्ये जो कोणता पक्ष बाजी मारेल त्या पक्षालाच विधानसभेमध्ये बहुमत मिळण्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे.
पंढरपूर तालुक्यातील भाजपचे उमेदवार समाधान आवताडे त्याचप्रमाणे भाजपाचे माजी विधान परिषद आमदार प्रशांतराव परिचारक आणि नुकतेच भाजपा ला या निवडणुकीमध्ये पाठिंबा दिलेले श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे अशा मातब्बरांना भाजपाने आमदारकीचे गाजर हे दाखवून भाजपाच्या या लोकसभेच्या दोन्ही उमेदवाराला मताधिक्य मिळवण्यासाठी हे आमदारकीचे गाजर दाखवल्याचे समजते. पाहूया आता पंढरपूर तालुक्यातील कुणाकुणाला गाजर दाखवली जाते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा