"आला आला वारा संगे पावसाच्या धारा" पंढरी नगरी भिजून चिंब झाली.

 पंढरपूर ( प्रतिनिधी) जवळपास 43 ते 44 सेल्सिअस चे तापमान आपला सोलापूर जिल्हा सहन करीत होता. आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या धारा आज पंढरपूरकरांनी अनुभवले. 

     पंढरी नगरी मध्ये येणारे भावीक भक्त पंढरपूर शहरांमध्ये आल्यानंतर या पंढरी नगरीतील उष्ण तापमान आला सामोरे जात होते. चंद्रभागेमध्ये सोडलेल्या पाण्यामध्ये मनसोक्त डुबंण्याचा आनंद हे भाविकभक्त घेत होते. आज सायंकाळच्या दरम्यान ला झालेल्या या मुसळधार पावसामुळे भावीक भक्त तसेच पंढरपूर रहिवासी आज आनंदून गेले. 

       पंढरपूर शहर व आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये आज या पावसाच्या धारा बरसल्या शेतकरी वर्ग तसेच उन्हाने हैराण झालेले पंढरपूर वाशी नागरिक यांनी आज पावसामध्ये भिजून आनंद व्यक्त करत असल्याचे चित्र आज पंढरपूर तालुक्यांमध्ये व पंढरपूर शहरांमध्ये दिसून येत होते. या झालेल्या पावसामुळे हवे मधील उष्णता कमी होऊन थंडगार अल्हाददायक चित्र सर्वत्र पसरल्याचे दिसून येते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "