"आता सर्वसामान्य जनतेने ठरवले आहे....भाजपाला घरी बसवायचे ".... प्रणिती ताई शिंदे
पंढरपूर ( प्रतिनिधी) . आता सर्वसामान्य जनतेनेच ठरवलेलं आहे की भाजपाला घरी बसवायचे. असे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आय काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांनी आज पंढरपूर येथे बुथ बैठकी मध्ये वक्तव्य केले.
भाजपाचा गेल्या दहा वर्षाच्या राजवटीमध्ये सर्वसामान्य जनता, शेतकरी ,बेरोजगार तरुणही होरपळून निघालेला आहे. त्यामुळे आज सोलापूर लोकसभा मतदारसंघ असो किंवा अन्य लोकसभा मतदारसंघात या मतदारसंघातील सर्वसामान्य जनता ही भाजपाला घरी बसवायचं म्हणजे बसवायचं असं म्हणू लागली आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये गावोगावी फिरत असताना शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुण, महिला यांनी या भाजपा सरकारच्या संदर्भामध्ये असंख्य तक्रार या त्यांनी सांगितल्या आहेत. गेल्या दहा वर्षातील दोन्ही खासदाराने सोलापूर मतदार संघासाठी काही विकास कामे केलेली नाही. किंवा कुठले मोठे प्रोजेक्ट आणले नाहीत. सोलापूर शहराला भेडसावणारा पाणी प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. अशा असंख्य कारणाने आज मतदार राजा नाराज झाला आहे.
सध्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे एखाद्या शाखा प्रमुखाप्रमाणे कार्यकर्ते व नेते लोकांना दमबाजी करू लागलेले आहेत. हे त्यांच्या पदाला अशोभनीय आहे. या सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये आणि माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये नरेंद्र मोदी ,योगी त्याचप्रमाणे असंख्य मान्यवर नेते मंडळी ही या दोन मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे या दोन्ही मतदार संघातील भाजपच्या जागा या भाजपाच्या हातून गेल्यात जमा झाले आहे. असे त्यांना जाणवू लागल्यामुळे त्यांनी या भागाकडे जास्त लक्ष देण्याचे ठरवलेले दिसत आहे. परंतु रात्र वैऱ्याची आहे. जागे रहा असे आवाहन आम्ही काँग्रेसच्या वतीने करीत आहोत. तरी सर्वसामान्य जनतेने त्यांच्या मनात असलेला हा रोष येत्या सात तारखेला आपल्या मतदानाच्या माध्यमातून भाजपावर व्यक्त करा. असे या बुथ बैठकीच्या वेळी त्याने आपले मनोगतामधून व्यक्त केले.
यावेळी उपस्थित पंढरपूर शहरातील नगरसेवक तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते, शिवसेना उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे नेते व कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा