"दादा,.,.. तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला तरीही?"
पंढरपूर ( प्रतिनिधी) . राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर अजित पवार यांच्यासोबत काही राष्ट्रवादीचे आमदार भाजपा व शिंदे शिवसेना यामध्ये सामील होऊन सत्ता स्थानी विराजमान झाले. त्याचबरोबर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह देखील सोबत घेऊन गेले. या राष्ट्रवादीमधील घडामोडीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चर्चा सुरू झाली. अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ राजकारणी माणसाच्या सहवासात व सानिध्यात राहून अजित पवार यांनी केलेले बंड हे शरद पवार तसेच त्यांचे कुटुंब व संपूर्ण महाराष्ट्रातील शरद प्रेमी जनतेला आवडले नाही.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी मधील काही आमदारांना घेऊन भाजपा व शिंदे सेना बरोबर सरकार स्थापन केल्यानंतर त्यांच्यावर उच्चस्तरीय चौकशी जी होणार होती, ती टळली. व त्यांच्यावरील असलेले घोटाळ्याचे आरोप हे देखील थंड झाले.भ्रष्टाचाराच्या या आरोपाला घाबरून अजित पवार हे भाजपच्या सोबत गेले की काय? अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर झाली.
मध्यावधी लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये काही नाम मात्र जागा ही अजित पवार गटाला मिळाल्या आहेत .या जागा लोकसभेच्या लढवत असताना त्यांना भाजपा व शिंदेसेनाच्या उमेदवारांचा प्रचार देखील करावा लागत आहे .या प्रचार दौऱ्यामध्ये त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले. भाजपा नेते ज्याप्रमाणे शरद पवारांना टार्गेट करून त्यांच्यावर टीका करीत असतात. त्याच पद्धतीची टीका अजित पवार यांच्याकडून देखील होऊ लागल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व जनता अचिंबित झाली. ज्या शरद पवारांनी अजित पवार यांना राजकारणात आणले, राजकारणाचे धडे दिले, असंख्य पदे व मंत्रिपदे, उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांना संधी दिली. परंतु अजून मोठी संधी मला शरद पवारांनी द्यायला हवी होती. अशी अभिलाषा धरून असलेले अजित पवार हे मुख्यमंत्र्यांच्या पदाच्या लालसेपोटी भाजपा व शिंदे सेनेमध्ये सामील झाले की काय? अशी चर्चा पवार प्रेमी जनतेत सुरू आहे.
शरद पवार यांच्यावर टीका करताना कुणीतरी वरिष्ठ भाजपा नेत्यांनी ठरवून दिलेले शब्द याचा वारंवार उल्लेख करून त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. व करत आहेत. नुकतेच पुणे येथे झालेल्या सभेमध्ये त्यांनी शरद पवारांवर टीका करीत असताना "शरद पवारांचा मी मुलगा नसल्यामुळे मला मोठ्या पदाची संधी दिली जात नाही" दुजाभाव केला जातो. असे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करीत असताना पवार साहेबांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. त्याचप्रमाणे शरद पवार यांनी आमचे मते व म्हणणे ऐकून घेतले नाही. असा देखील त्यांनी आरोप केला. या आरोपावर प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी आपले मत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की "पवार साहेबांनी त्यांना काय दिले आणि काय नाही ही संपूर्ण महाराष्ट्रातील जनता जाणते" एवढ्या वाक्या मधूनच त्यांनी आपले मत व्यक्त केले.
आज घडीला अजित पवार यांनी केलेल्या टीकेवर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य शरद पवार प्रेमी मंडळी जनता ही अजित पवारांना विचारू लागलेली आहे. तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला म्हणून तुम्हाला या राजकारणातील व राजकीय उच्चपदे मंत्रीपदे उपमुख्यमंत्री पद असे अनेक पदे वारंवार मिळत गेली .ती फक्त शरद पवार यांच्या कृपेमुळेच जर अजित पवार हे पवार कुटुंबात जन्माला आले नसते, आणि सर्वसाधारण शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला आले असते तर त्यांनी एवढी मोठी पदे उपभोगले असते का? असा देखील सवाल सर्वसामान्य जनता करु लागली आहे. सुप्रिया सुळे यांचा राजकारणामधील प्रवेश हा अजितदादा यांच्यानंतर झाला. अजित दादा हे सुप्रिया सुळे यांना राजकारणामध्ये ज्येष्ठ आहेत. शरद पवार यांनी अजित पवार यांना राजकारणामधील पदे व आमदारकी खासदार किंवा मंत्रीपदे ही शरद पवार यांच्यामुळे मिळाली हे ते विसरले की काय? . अजित पवार यांना अजून कोणती मोठी पदे अपेक्षित आहे ?असा सवाल देखील सर्वसामान्य जनता करु लागली आहे.
सर्वपक्षीय नेते मंडळी हे कार्यकर्ते यांच्या जीवावरच मोठे होतात. नेते होतात, या नेते मंडळीने कधी आपला कार्यकर्ता हा मोठा व्हावा, असे कधी या नेते मंडळींना वाटलेच नाही. आणि वाटणार देखील नाही. एवढी पदे आमदारकी, खासदारकी, त्याचप्रमाणे मंत्रिपदे,असे पदे उपभोगले तरी देखील या नेतेमंडळीची भूक काय मिटलेली नाही हे स्पष्ट होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा