पोस्ट्स

"येत्या विधानसभेला मी आमदार होणार" अभिजीत आबा पाटील

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी  आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री विठुरायाला  शेतकरी, कष्टकरी, ऊस उत्पादक, कामगार आणि तरुण वर्ग हा सुखी व्हावा समृद्ध व्हावा. पंढरपूर मंगळवेढा तसेच माढा या ठिकाणी व सर्वत्र पाऊस व्हावा व शेतकरी, कष्टकरी समाधानी व्हावे असे सांकडें  त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने विठुरायाला घातले.      श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन नामदेव पायरी येथे महाआरती केल्यानंतर चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी येत्या विधानसभेला "मी आमदार होणार"  असे सांगून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ व तसेच माढा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघा मधील लोक सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, तरुण वर्ग हा मला भावी आमदार म्हणून माझा उल्लेख करतात. सर्वसामान्य जनता मला आमदार च्या रूपामध्ये पाहायला उत्सुक आहेत. सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार आणि तरुण व...

"समाज उपयोगी विविध कार्यक्रम घेऊन चेअरमन भावी आमदार अभिजीत आबा पाटील यांचा वाढदिवस साजरा होणार"

इमेज
पंढरपूर ( प्रतिनिधी) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे धडाडीचे युवा चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या 39 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका व माढा तालुक्यातील गावांमधून विविध कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य कुस्ती मैदान, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, महाआरोग्य शिबिर, डोळे तपासणी शिबिर, कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता, शेतकरी, ऊस उत्पादक सभासद व तरुण वर्ग यांच्याशी आपले नाते दृढ करण्याच्या उद्देशाने व शेतकरी सभासदांच्या आरोग्याची जपणूक करण्याच्या उद्देशाने विविध आरोग्य शिबिर आयोजित करून सर्वसामान्य जनतेची व शेतकरी बांधवांची सेवा करण्याच्या उद्देशाने आपला हा 39 वा वाढदिवस अभिजीत आबा पाटील एक ऑगस्ट रोजी या दिवशी साजरा करणार आहेत.       एक ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता संत नामदेव पायरी येथे महाआरती, सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी टेंभुर्णी येथे छत्रपती शिवाजी ...

"भावी आमदार अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जय्यत तयारी "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) भावी आमदार म्हणून ओळखले जाणारे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर येथे मोठी तयारी सुरू असल्याचे दिसत आहे.        चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी मोजक्या अल्पावधीत संपूर्ण पंढरपूर तालुका व शहर या परिसरामध्ये आपल्या कार्याची ओळख निर्माण करून सर्वसामान्य जनता, शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी, त्याचप्रमाणे तरुण वर्ग यांचे जीवन मान सुधारण्याच्या उद्देशाने व ऊस उत्पादक शेतकरी यांचे भले करण्याच्या उद्देशाने त्यांनी राजकीय क्षेत्रात उडी घेऊन आपल्या कार्याने सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये एक आशादायी वातावरण निर्माण करून सर्वसामान्य जनता चेअरमन अभिजीत आबा पाटील यांना भावी आमदार म्हणून संबोधू लागलेली आहे. अशा या तरुण नेतृत्वाला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये सर्वसामान्य जनतेची सेवा करणारा युवक म्हणून चेअरमन अभिजीत आबा पाटील यांची ओळखले जात आहे.       १ ऑगस्ट रोजी अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक मान्यवर नेतेमंडळीं उपस्थित रहाणार आहेत.

" संत सावतामाळी पतसंस्थेची आर्थिक बाजू भक्कम करणार" चेअरमन राजाराम वाघमारे.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) . कोर्टी येथील नुकतीच झालेल्या संत सावता माळी ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी राजाराम वाघमारे यांची चेअरमन पदी निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली.      चेअरमन पदी निवड झाल्यानंतर सत्कार प्रसंगी बोलत असताना नूतन चेअरमन राजाराम वाघमारे आपल्या मनोगतामध्ये ते पुढे बोलत असताना म्हणाले संत सावतामाळी पत संस्थेची आर्थिक स्थिती ही भक्कम करणार सभासद व कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणार व पतसंस्थेचा कारभार पारदर्शक पद्धतीने चालवून एक आदर्श संस्था म्हणून नावलौकिक मिळवून देणार. असे त्यांनी आपले मनोगत सत्कार प्रसंगी व्यक्त केले.       संत सावता माळी पतसंस्थेच्या निवडी प्रसंगी सुधाकरपंत परिचारक कारखान्याचे संचालक भैरव माळी, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक धोंडीबा वाघमारे ,माजी चेअरमन रघुनाथ वाघमारे, नूतन संचालक मुरलीधर हाके, दादा वाघमारे, भैरू वाघमारे, युवा नेते अमोल दहिवडकर, संजय वाघमारे, भाऊसाहेब टोपे, ज्ञानेश्वर व्हनमाने तसेच माळी, टोपे, वाघमारे, समाजातील सर्व बांधव व नूतन संचालक व ग्...

"मराठा व धनगर आरक्षणावर केंद्र शासन व राज्य शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा". खासदार प्रणिती शिंदे

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाज व मराठा समाज या दोन्ही समाजाच्या कडून आरक्षणाची मागणी ही गेली कित्येक वर्षापासून सातत्याने होत आहे. धनगर समाज हा अनुसूचित जमाती मधून आरक्षण मागतोय तर मराठा समाज हा ओबीसी मधून आरक्षण मागतोय. महिलांच्यासाठीचा असलेला 30% चा आरक्षण बाबत देखील शासन निर्णय घेत नाही. मराठा व धनगर समाजाचा आरक्षणाचा लढा हा संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या सुरू आहे. या दोन्ही समाजाच्या आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण होते की काय?  अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे . केंद्र सरकार व राज्य सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा. अशी मागणी सोलापूर जिल्ह्याच्या महिला खासदार प्रणिता ताई शिंदे यांनी आज लोकसभेमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील या मराठा व धनगर समाजाच्या ज्वलंत प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला.      आय काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी देखील संपूर्ण देशभरामधील विविध जातीची जात गणना ही लवकरात लवकर व्हायला हवी अशी मागणी केलेली आहे. जात गणना झाल्यानंतर आरक्षण बाबत टक्केवारी ही ठरवता येईल...

कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी महोत्सव २०२४ "कृषी पंढरी" चे भव्य उद्घाटन.

इमेज
 पंढरपूर (  प्रतिनिधी). आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या वारकरी बांधवा ंमध्ये असंख्य वारकरी हे शेतकरी असून या शेतकरी बांधवांना कृषी पंढरी . माध्यमातून शेती विषयक आधुनिक तंत्रज्ञान अवजारे खते कीटकनाशके औषधे ठिबक सिंचन आणि शेतीला जोडधंदा म्हणून शेतीपूरक असलेले अन्य उद्योगधंदे याबाबतची माहिती शेतकरी बांधवांना होण्याच्या उद्देशाने पंढरपूर येथील पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी महा महोत्सव चे आयोजन केलेले आहे..     या कृषी पंढरी नावाने हा महोत्सव केला जाणार आहे या कृषी पंढरीच्या उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे कृषिमंत्री धनंजय राव मुंडे त्याचप्रमाणे राज्यमंत्री अब्दुल सत्तार असे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या कृषी पंढरीचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश दादा गायकवाड यांनी आज रोजी दिली.      या कृषी पंढरी महोत्सवास सर्व शेतकरी बांधवांनी व वारकरी बांधवांनी उपस्थिती लावून या कृषी पंढरी महाउत्सवाचा लाभ घ्यावा असे नम्र आव्हान सभापती हरीश दादा गायकवाड यां...

आरोग्याची वारी वारकऱ्यांच्या साठी झाली .पंढरपूर वासींच्या आरोग्याचे काय? ... पंढरपूर करांचा संतप्त सवाल...मोफत आरोग्यसेवेची मागणी

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) आषाढी यात्रेनिमित्त पंढरी नगरी मध्ये येणाऱ्या वारकरी बांधवांचे आरोग्य जपण्याच्या उद्देशाने पंढरपूर शहराच्या आजूबाजूला चार ठिकाणी महाआरोग्य शिबिराची नियोजन करण्यात आले होते. या महाआरोग्य शिबिरामधून लाखोच्या संख्येने वारकरी बांधवांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. ही महाराष्ट्र शासनाने वारकरी भाविक भक्तांची त्यांच्या आरोग्याची घेतलेली काळजी ही खरोखरच कौतुकास्पद आहे. वारकरी बांधवांनी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाला खूप खूप धन्यवाद दिले परंतु....   या पंढरी नगरीमध्ये राहणारे काही लाखाच्या संख्येने असलेले रहिवासी यांच्या आरोग्याचे काय? असा सवाल आता पंढरपूर वाशी यांच्या मधून संतप्तपणे विचारला जाऊ लागलेला आहे. आषाढी यात्रेच्या अगोदर सप्तमी ,अष्टमी नवमी, दशमी ते पौर्णिमा पर्यंत वारकरी बांधव हे पंढरपूर शहरांमध्ये राहत असतात. पौर्णिमा झाल्यानंतर वारकरी भाविक भक्त  पंढरपूर शहरांमध्ये असे लाखोच्या संख्येने आलेले भाविक भक्त विठुरायाचा निरोप घेतल्यानंतर आपापल्या गावी निघून जातात. त्यानंतर पंढरपूर शहरांमधील ठिकठिकाणी अस्वच्छतेचे दर्शन घडायला सुरुवात होते. शासनाने वा...