कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी महोत्सव २०२४ "कृषी पंढरी" चे भव्य उद्घाटन.
पंढरपूर ( प्रतिनिधी). आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या वारकरी बांधवा ंमध्ये असंख्य वारकरी हे शेतकरी असून या शेतकरी बांधवांना कृषी पंढरी . माध्यमातून शेती विषयक आधुनिक तंत्रज्ञान अवजारे खते कीटकनाशके औषधे ठिबक सिंचन आणि शेतीला जोडधंदा म्हणून शेतीपूरक असलेले अन्य उद्योगधंदे याबाबतची माहिती शेतकरी बांधवांना होण्याच्या उद्देशाने पंढरपूर येथील पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी महा महोत्सव चे आयोजन केलेले आहे..
या कृषी पंढरी नावाने हा महोत्सव केला जाणार आहे या कृषी पंढरीच्या उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे कृषिमंत्री धनंजय राव मुंडे त्याचप्रमाणे राज्यमंत्री अब्दुल सत्तार असे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या कृषी पंढरीचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश दादा गायकवाड यांनी आज रोजी दिली.
या कृषी पंढरी महोत्सवास सर्व शेतकरी बांधवांनी व वारकरी बांधवांनी उपस्थिती लावून या कृषी पंढरी महाउत्सवाचा लाभ घ्यावा असे नम्र आव्हान सभापती हरीश दादा गायकवाड यांनी केले

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा