"समाज उपयोगी विविध कार्यक्रम घेऊन चेअरमन भावी आमदार अभिजीत आबा पाटील यांचा वाढदिवस साजरा होणार"
पंढरपूर ( प्रतिनिधी) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे धडाडीचे युवा चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या 39 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका व माढा तालुक्यातील गावांमधून विविध कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य कुस्ती मैदान, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, महाआरोग्य शिबिर, डोळे तपासणी शिबिर, कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता, शेतकरी, ऊस उत्पादक सभासद व तरुण वर्ग यांच्याशी आपले नाते दृढ करण्याच्या उद्देशाने व शेतकरी सभासदांच्या आरोग्याची जपणूक करण्याच्या उद्देशाने विविध आरोग्य शिबिर आयोजित करून सर्वसामान्य जनतेची व शेतकरी बांधवांची सेवा करण्याच्या उद्देशाने आपला हा 39 वा वाढदिवस अभिजीत आबा पाटील एक ऑगस्ट रोजी या दिवशी साजरा करणार आहेत.
एक ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता संत नामदेव पायरी येथे महाआरती, सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी टेंभुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांची उपस्थिती वाढदिवसाच्या निमित्ताने राहणार आहे. सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी अरण येथे श्री संत सावता माळी यांचे दर्शन करणार आहेत. सकाळी 11 वाजता माढा येथे या ठिकाणी माढा शहराचे कुलदैवत माढेश्वरी देवीचे दर्शन अभिजीत आबा हे घेणार आहेत.
त्यानंतर चेअरमन अभिजीत आबा पाटील दुपारी दोन वाजता श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेनूनगर पंढरपूर या ठिकाणी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै. औदुंबर अण्णा पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत.
दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा येथील संत दामाजी मंदिर, त्याचप्रमाणे पीर साहेब दर्गा, आणि संत चोखोबा समाधी, तुळजाभवानी मंदिर या मंगळवेढा येथील मंगळवेढा वाशी यांचे श्रद्धास्थान असलेले मंदिर यांचे ते दर्शन घेणार आहेत.
पंढरपूर येथे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय येथे संध्याकाळी सात वाजता अभिजीत आबा पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. व सर्व कार्यकर्ते, हितचिंतकाच्या वाढदिवसानिमित्त च्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत व त्यांची किती उपस्थिती राहणार आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा