आरोग्याची वारी वारकऱ्यांच्या साठी झाली .पंढरपूर वासींच्या आरोग्याचे काय? ... पंढरपूर करांचा संतप्त सवाल...मोफत आरोग्यसेवेची मागणी


 पंढरपूर ( प्रतिनिधी) आषाढी यात्रेनिमित्त पंढरी नगरी मध्ये येणाऱ्या वारकरी बांधवांचे आरोग्य जपण्याच्या उद्देशाने पंढरपूर शहराच्या आजूबाजूला चार ठिकाणी महाआरोग्य शिबिराची नियोजन करण्यात आले होते. या महाआरोग्य शिबिरामधून लाखोच्या संख्येने वारकरी बांधवांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. ही महाराष्ट्र शासनाने वारकरी भाविक भक्तांची त्यांच्या आरोग्याची घेतलेली काळजी ही खरोखरच कौतुकास्पद आहे. वारकरी बांधवांनी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाला खूप खूप धन्यवाद दिले परंतु....

  या पंढरी नगरीमध्ये राहणारे काही लाखाच्या संख्येने असलेले रहिवासी यांच्या आरोग्याचे काय? असा सवाल आता पंढरपूर वाशी यांच्या मधून संतप्तपणे विचारला जाऊ लागलेला आहे. आषाढी यात्रेच्या अगोदर सप्तमी ,अष्टमी नवमी, दशमी ते पौर्णिमा पर्यंत वारकरी बांधव हे पंढरपूर शहरांमध्ये राहत असतात. पौर्णिमा झाल्यानंतर वारकरी भाविक भक्त  पंढरपूर शहरांमध्ये असे लाखोच्या संख्येने आलेले भाविक भक्त विठुरायाचा निरोप घेतल्यानंतर आपापल्या गावी निघून जातात. त्यानंतर पंढरपूर शहरांमधील ठिकठिकाणी अस्वच्छतेचे दर्शन घडायला सुरुवात होते. शासनाने वारकऱ्यांच्यासाठी शौचालय ठिकठिकाणी उभे केलेले होते. परंतु शहराच्या बाहेरील भागामध्ये अशा शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे कित्येक लोक उघड्यावर शौच करत असताना दिसून आले. आजच्या घडीला जरी शहराच्या बाहेर गेल्यास आपल्याला  रस्त्याच्या कडेने लोकांनी केलेली घाणही सर्वत्र दिसून येत आहे. उपनगर भागामध्ये कित्येक वारकरी संप्रदाय हे आश्रयाला उतरलेले होते कासेगाव रोड, सांगोला रोड, कोर्टी रस्ता, वाखरी रस्ता, इस बावी, शेगाव दुमाला तसेच तीन रस्ता, गोपाळपूर मंगळवेढा रोड अशा रस्त्याच्या कडेला घाणीचे साम्राज्य सर्वत्र पसरलेले सद्यस्थितीला दिसून येत आहे.

     फक्त कचरा गोळा करणे म्हणजे वारकऱ्यांची आरोग्य जपल्यासारखे असे होते की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

    राज्य सरकारने वारकऱ्यांचे आरोग्य जपले त्यांच्यासाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या परंतु पंढरपूर शहरातील जनतेला आरोग्य उपचारासाठी महागड्या अशा दवाखान्यामध्ये जावे लागते.  हा त्रास दरवर्षी प्रत्येक वारीच्या वेळी स्थानिक रहिवाशांना होत असतो. याच्याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. पंढरपूर शहरातील वैद्यकीय व्यवसाय करणारे आता वारी झाल्यानंतर सुट्टी संपवून शहरांमध्ये येतील आणि पंढरपूर वासियांच्या आरोग्याची सेवा माफक दरात? करू लागतील. 

  पंढरपूर नगरपालिका तसेच महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाच्या वतीने ज्याप्रमाणे महाआरोग्य शिबीर वारकऱ्यांच्यासाठी राबवले गेले अशाच प्रकारची आरोग्य शिबिर काही दिवस पंढरपूर शहरांमध्ये मोफत राबवले गेले पाहिजे. अशी मागणी पंढरपूर रहिवाशांच्या मधून सद्यस्थितीला होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....