"येत्या विधानसभेला मी आमदार होणार" अभिजीत आबा पाटील
पंढरपूर ( प्रतिनिधी) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री विठुरायाला शेतकरी, कष्टकरी, ऊस उत्पादक, कामगार आणि तरुण वर्ग हा सुखी व्हावा समृद्ध व्हावा. पंढरपूर मंगळवेढा तसेच माढा या ठिकाणी व सर्वत्र पाऊस व्हावा व शेतकरी, कष्टकरी समाधानी व्हावे असे सांकडें त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने विठुरायाला घातले.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन नामदेव पायरी येथे महाआरती केल्यानंतर चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी येत्या विधानसभेला "मी आमदार होणार" असे सांगून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ व तसेच माढा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघा मधील लोक सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, तरुण वर्ग हा मला भावी आमदार म्हणून माझा उल्लेख करतात. सर्वसामान्य जनता मला आमदार च्या रूपामध्ये पाहायला उत्सुक आहेत. सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार आणि तरुण वर्ग महिला माता भगिनी यांची जर का मला आमदार करण्याची इच्छा असेल तर मी पंढरपूर मंगळवेढा व तसेच माढा या दोन्ही मतदारसंघापैकी कुठूनही येत्या विधानसभेला उभे राहून सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी ऊस उत्पादक तरुण व माता-भगिनी यांची सेवा करण्यासाठी मी आमदार जरूर होईन. असे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
चेअरमन अभिजीत आबा पाटील यांना पत्रकार बांधवांनी आपण कोणत्या पक्षाच्या वतीने विधानसभेला उभे राहणार आहात? असा प्रश्न विचारला असता अभिजीत आबा पाटील यांनी या प्रश्नाला बगल देत अभिजीत पाटील यांनी सांगितले की येत्या विधानसभेला मी आमदार होणार एवढं सांगू शकतो. असे म्हणून त्यांनी राजकीय पक्षांचे नाव न घेता आपण आमदार होणार हे सांगितले.
चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर मंगळवेढा तसेच माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये असंख्य समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केलेले असून या कार्यक्रमाला चेअरमन अभिजीत आबा पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा