" संत सावतामाळी पतसंस्थेची आर्थिक बाजू भक्कम करणार" चेअरमन राजाराम वाघमारे.


 पंढरपूर ( प्रतिनिधी) . कोर्टी येथील नुकतीच झालेल्या संत सावता माळी ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी राजाराम वाघमारे यांची चेअरमन पदी निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली. 

    चेअरमन पदी निवड झाल्यानंतर सत्कार प्रसंगी बोलत असताना नूतन चेअरमन राजाराम वाघमारे आपल्या मनोगतामध्ये ते पुढे बोलत असताना म्हणाले संत सावतामाळी पत संस्थेची आर्थिक स्थिती ही भक्कम करणार सभासद व कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणार व पतसंस्थेचा कारभार पारदर्शक पद्धतीने चालवून एक आदर्श संस्था म्हणून नावलौकिक मिळवून देणार. असे त्यांनी आपले मनोगत सत्कार प्रसंगी व्यक्त केले. 

     संत सावता माळी पतसंस्थेच्या निवडी प्रसंगी सुधाकरपंत परिचारक कारखान्याचे संचालक भैरव माळी, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक धोंडीबा वाघमारे ,माजी चेअरमन रघुनाथ वाघमारे, नूतन संचालक मुरलीधर हाके, दादा वाघमारे, भैरू वाघमारे, युवा नेते अमोल दहिवडकर, संजय वाघमारे, भाऊसाहेब टोपे, ज्ञानेश्वर व्हनमाने तसेच माळी, टोपे, वाघमारे, समाजातील सर्व बांधव व नूतन संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक निकाल जाहीर होताच गुलालाची उधळण व आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....