"भावी आमदार अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जय्यत तयारी "
पंढरपूर ( प्रतिनिधी) भावी आमदार म्हणून ओळखले जाणारे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर येथे मोठी तयारी सुरू असल्याचे दिसत आहे.
चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी मोजक्या अल्पावधीत संपूर्ण पंढरपूर तालुका व शहर या परिसरामध्ये आपल्या कार्याची ओळख निर्माण करून सर्वसामान्य जनता, शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी, त्याचप्रमाणे तरुण वर्ग यांचे जीवन मान सुधारण्याच्या उद्देशाने व ऊस उत्पादक शेतकरी यांचे भले करण्याच्या उद्देशाने त्यांनी राजकीय क्षेत्रात उडी घेऊन आपल्या कार्याने सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये एक आशादायी वातावरण निर्माण करून सर्वसामान्य जनता चेअरमन अभिजीत आबा पाटील यांना भावी आमदार म्हणून संबोधू लागलेली आहे. अशा या तरुण नेतृत्वाला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये सर्वसामान्य जनतेची सेवा करणारा युवक म्हणून चेअरमन अभिजीत आबा पाटील यांची ओळखले जात आहे.
१ ऑगस्ट रोजी अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक मान्यवर नेतेमंडळीं उपस्थित रहाणार आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा