. " शेतमाला ला योग्य भाव मिळावा ही विठूराया साकडं घालायला हवे होते".....सामान्य शेतकरीची मागणी..
पंढरपूर....
. विठूरायाच्या आषाढी यात्रेच्या निमित्ताने शासकिय पुजा राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस याच्या शुभहस्ते पार पडली.सोबत त्याच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस होत्या.
. यंदाच्या आषाढी यात्रेच्या महापुजाचा लाभ वारकरीभक्त बाबासाहेब माने सौ.प्रभावती माने याना झाला.
. यावेळी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस याच्या सोबत अन्य मान्यवर आणि मंदीर समितीचे अध्यक्ष गहणिनाथ महाराज औसेकर व मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.
. मुख्यमंत्री फडणवीस यानी विठूराया कडे साकडे घातले यंदा पाऊस भरपूर पडावा शेतकरी राजा सुखी समाधानी व्हावा.असे साकडे घातल्याचे फडणवीस यानी सागितले.
. राज्यातील तसेच संपूर्ण देशातील बळीराजा हा आपले शेतशिवार बहरुन यावा.धनधान्य भरपूर यावे देशातील सर्वसामान्य जनता सुखी व्हावा अशी अपेक्षा विठूरायाकडे मागतो.शेतीसाठी लागणारे बी बियाणे,खते स्वस्त व्हावे,शेतीमाला ला योग्य भाव मिळावा शेतकरी कर्जमुक्त व्हावा,आणि सुख समाधान आपल्या जीवनात यावे असे साकडे विठूराया ला घालतात.
. मुख्यमंत्री यानी भरपूर पाऊस पडावा.शेतकरी सुखी व्हावा असे साकडे विठूरायाला घालतात.परंतू शेतकरी राजाला आवश्यक असलेले बी बियाणे खते ही बाजारात महाग विकली जातात.अनेक ठिकाणी बोगस बी बियाणे सर्रास विकली जातात.शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही.कर्ज फिटत नाही.या बळीराजाच्या जीवन मरणाच्या या मागण्यासाठी विठूरायाला कडे शासनाचे मंत्री महोदय साकडे का घालत नाही.? असा प्रश्न विठूरायाचे भाविक भक्त, शेतकरी राजा आज विचारत आहे.
. शेतकरी राजाच्या या मागणीचा विचार मार्ग शासनाचे मंत्री महोदय कधी करणार? आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी भल्यासाठी विठुरायाकडे कधी साकडे घालणार? याची वाट सर्वसामान्य भाविक भक्त शेतकरी राजा पाहत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा