"नियोजित कॉरिडोर ची व्याप्ती वाढवावी लागणार"...... . छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चौफाळा कृष्ण मंदीर प्रदक्षणा मार्ग यंदा प्रचंड गर्दीचे दर्शन.
पंढरपूर.
. यंदाची आषाढी यात्रेत गर्दीचा महासागर पंढरपूरवासीयाना पहायला मिळाला.अभूतपुर्व अशी आषाढी यात्रा भरल्यामुळे आलेल्या भक्ताची संख्या किती लाखाची आहे याचा अनुमान काढणे अशक्य वाटत आहे.
. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिर परिसर प्रदर्शना मार्ग चौफाळा, श्रीकृष्ण मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड, गजानन महाराज मठ तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आली. वारकरी बांधवांना चालताना अनेक अडचणी आल्याचे दिसून आले.
. वारकरी भाविक भक्त हे पंढरपूरला जोडणाऱ्या विविध मार्गावर चार ते पाच किलोमीटर अंतरावर आपल्या राहुट्या व त्या परिसरातील मठामधून, घरामधून आपला मुक्काम केल्याचे दिसून आले. पंढरपूर शहरातील मंदिर परिसरांमधील अनेक घरांमधून तसेच प्रदर्शना मार्गावरील अनेक घरामधून वारकरी भाविक पिढ्यानपिढ्या मुक्कामास येत असतात या भाविकांना देखील या गर्दीचा त्रास झाल्याचा दिसून आला
. कॅरिडोर ची व्याप्ती ही वाढवण्याची शक्यता निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून कॉरिडोर ची सुरुवात होणार अशी चर्चा संपूर्ण शहरांमध्ये सुरू होती व अजूनही तशी ती सुरू आहे या आषाढी यात्रेच्या निमित्ताने झालेल्या भाविकांच्या गर्दीमुळे कॅरिडॉर ची व्याप्ती महाराष्ट्र शासन वाढवणार की काय? अशी चर्चा सध्या भाविकांमधून आणि पंढरपूर रहिवासी यांच्यामधून सुरू असल्याचे दिसून येत आहे
. येणाऱ्या पन्नास वर्षाचा विचार करून पंढरपूर तीर्थक्षेत्र चा विकास आराखडा आणि कॅरिडॉर हा केला जाणार आहे. आजची गर्दी पाहता भविष्यामध्ये भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत. पंढरपूर रहिवाशांना आता या वाढीव गर्दीचा त्रास व सामना करावा लागणार आहे महाराष्ट्र शासनाने पंढरपूर विकास आराखडा मध्ये कॅरिडॉर च्या माध्यमातून प्रदक्षिणामार्ग हा मोठा केला जावा त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक हा देखील मोठ्या प्रमाणात दाटीवाटीने भरलेला असतो. या भागातून देखील कॅरिडोरची सुरुवात केली जावी अशी मागणी देखील आता स्थानिक व भाविक भक्ता मधून होत असल्याचे दिसून येत आहे.
.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा