" संतोष घाडगे सर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेले उपक्रम हे प्रेरणादायी ".... आयोजकांचे मनोगत.


 पंढरपूर....... सांगोला येथील सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय व आदर्श कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी 'शिक्षक गौरव पुरस्कार' वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यात पंढरपूर तालुक्यातील शांता प्रभू प्रशाला, अजनसोंड येथील उपक्रमशील शिक्षक श्री. संतोष हरिश्चंद्र घाडगे सर यांना त्यांच्या मोलाच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन 'शिक्षक गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता सांगोला येथील नगर परिषदेसमोरील अहिल्यादेवी होळकर सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा एल.के.पी. मल्टिस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले, सूर्योदय अर्बनचे चेअरमन डॉ. बंडोपंत लवटे, माजी चेअरमन जगन्नाथ भगत सर, एल.के.पी. मल्टिस्टेटचे व्हा. चेअरमन सुभाष दिघे सर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, मान्यवर आणि शिक्षक उपस्थित होते. श्री. संतोष घाडगे सरांनी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व शैक्षणिक प्रगतीसाठी केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे असे मनोगत आयोजकांनी व्यक्त केले.यावेळी अनिलभाऊ इंगवले यांचे हस्ते श्री. संतोष घाडगे सर यांना शाल, श्रीफळ, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सपत्निक व सपरिवार गौरविण्यात आले. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे प्रमुख वक्ते माननीय श्री नितीन बानगुडे पाटील   व उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन माननीय श्री शरणभैया बसवराज पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री. व्ही.एल. सर्वगोड सर व त्यांचे  सहकारी शिक्षक, कुटुंबीय व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपस्थितांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

" निवडणूक पूर्वी डॉ. बीपी रोंगे यांच्या प्रचाराची फेरी पूर्ण "...... . अन्य उमेदवार अद्यापही निष्क्रिय....

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"