" निवडणूक पूर्वी डॉ. बीपी रोंगे यांच्या प्रचाराची फेरी पूर्ण "...... . अन्य उमेदवार अद्यापही निष्क्रिय....


 पंढरपूर......

.      पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील यंदाच्या शिक्षक आमदार या पदासाठी पुणे विभागामध्ये येणारे जिल्हे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या पाच जिल्ह्यांमधून शिक्षक व शिक्षकेतर या मतदारांच्या माध्यमातून शिक्षक आमदार हा निवडला जातो. शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आढी अडचणी त्यांच्या कामकाजा मधील समस्या जुनी पेन्शन योजना तसेच अन्य समस्या व अडचणीसाठी त्यावर शासन दरबारामध्ये आवाज उठवून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून आपली उमेदवारी पंढरपूर येथील श्री विठ्ठल इंजिनिअरिंग कॉलेजचे संस्थापक प्राचार्य डॉ. बी पी रोंगे यांनी पुणे शिक्षक मतदार संघातून आपली उमेदवारी आपल्या आजपर्यंतच्या कार्याचा माध्यमातून आणि शिक्षक व शिक्षकेतर यांच्या मागणी व पाठिंबाच्या जोरावर डॉ. बीपी रोंगे यांनी पुणे शिक्षक मतदार संघातील या शिक्षक आमदार या पदासाठी आपली इच्छा आणि शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवण्याच्या उद्देशाने आपली उमेदवारी जाहीर केली आहे.

.      पुणे शिक्षक मतदार संघातील येणाऱ्या या पाच जिल्ह्यातील सर्व कॉलेजेस शाळा व शैक्षणिक संस्था यांना भेटी देऊन आपण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करण्याच्या साठी डॉक्टर बीपी रोंगे यांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या असंख्य अडीअडचणी त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे पुणे विभाग मतदार संघामधील असंख्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉक्टर बीपी रोंगे सरांना पाठिंबा दर्शवलेला असून त्यांच्या या प्रचार भेटीस मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांच्या मध्ये पाठिंबा मिळत आहे हे उच्चविद्याविभूषीत व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर बीपी रोंगे सर यांनी ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांची भवितव्य घडविले त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची देखील भविष्य उज्वल करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा उद्देशाने ते अथक प्रयत्न करीत आहेत त्यांच्या या प्रयत्नाला शिक्षक वर्गामधून मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा व प्रतिसाद मिळत आहे.

.     डॉ. बी पी रोंगे सर  यांच्या प्रचारार्थ यांच्या कन्या त्याचप्रमाणे सौभाग्यवती प्रेमलता रोंगे या आता प्रचारात सक्रिय झालेले असून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

.   कोल्हापूरची महालक्ष्मी असो की सोलापूरचे सिद्धेश्वर दैवत अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज असो की छत्रपती शिवरायांची सातारा राजधानी असो या सर्वत्र भागामधून डॉ. बीपी रोंगे सर यांना मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळत आहे

.    पुणे शिक्षक मतदार संघामधून सर्वात जास्त प्रचाराच्या फेरीमध्ये अग्रेसर असलेले डॉ. बीपी रोंगे सर यांनी आपल्या प्रचाराची पहिली फेरी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदरच पूर्ण केलेली आहे. अन्य इच्छुक विरोधक उमेदवार अद्यापही प्रचार दौऱ्यामध्ये चाचपडत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व घडामोडी पाहता डॉ. बीपी रोंगे सर पुणे शिक्षक मतदार संघामधून आमदारकी खेचून आणतात की काय हे पहावे लागेल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"