"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"


 पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर मंगळवेढा या मार्गावर धावणारी एसटी महामंडळाची बस क्रमांक९४०५ या बसमधून शालेय विद्यार्थी प्रथमेश पाटील राहणार ब्रह्मपुरी तालुका मंगळवेढा या ठिकाणी रहिवासी असलेला हा विद्यार्थी दररोज मंगळवेढा या ठिकाणी शाळेला येत असतो. या शालेय विद्यार्थ्यांच्या आजच्या दिवशी पास घरी विसरल्यामुळे तो सोलापूर मंगळवेढा या बस मध्ये बसल्यानंतर वाहकांनी त्याला पासची विचाणा केले असता त्या विद्यार्थ्यांनी मी नेहमीच या बसने येत जा करत असतो परंतु आज माझा चुकून पास घरी विसरलेला आहे. तरी तुम्ही माझ्या वडिलांना फोन करून सांगा आणि एसटीचे पैसे मोबाईलवर मागून घ्या माझ्याजवळ पैसे नाही. असे सांगितल्यानंतर देखील एसटी महामंडळाच्या वाहकाने या प्रथमेश पाटील या विद्यार्थ्याला भर हायवेच्या रस्त्यावर अनोळखी या ठिकाणी त्याला खाली उतरवण्यात आले. 

     अशा निर्दयी एसटी बस वाहकाला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी. अशी मागणी पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या तक्रारीमध्ये उल्लेख करून त्यांनी एसटी महामंडळ सर्व व्यवस्थापकाला पत्र दिले आहे. या एसटी बस वाहकाला त्वरित निलंबित करण्यात यावे व त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी देखील मागणी आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "