" उजनीच्या साचलेल्या गाळामध्ये डेटा सेंटर उभा राहणार का "?..... . जनतेचा संताप सवाल


 पंढरपूर........

.    स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी उजनी धरणाची उभारणी केली महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाणारे हे उजनी धरण या उजनी धरणाच्या पाण्यावर कित्येक तालुके आणि जिल्हे हे सुजलाम सुफलाम झाले आणि शेतकरी राजाच्या घरामध्ये सुख-समृद्धी आणण्याचे काम या उजनी धरणाच्या पाण्याने केले.

.   उजनी धरणाच्या स्थापनेपासून आजपर्यंत गेली कित्येक वर्ष या उजनी धरणामध्ये साचलेला गाळ हा काढण्यात आलेला नाही नुकतेच सर्वेक्षण झाले या सर्वेक्षणामध्ये 68% गाळ या उजनी धरणामध्ये असल्याचे नमूद करण्यात आले . जर 68% गाळ या उजनी धरणात असेल तर या धरणामध्ये पावसाचे पाणी कसे साचणार हा सरळ साधा प्रश्न सर्वसामान्य जनता व शेतकरी विचारत आहे.

.      महाराष्ट्र शासनाने व सोलापूर व पुणे जिल्ह्यातील मान्यवर नेते मंडळींनी या उजनी धरणातील साचलेल्या गाळाविषयी आवाज यापूर्वीच उठवायला हवा होता. माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व मोहिते बंधू यांनी गेली काही वर्ष उजनी धरणातील गाळ काढण्याविषयी सातत्याने शासनाकडे मागणी केली परंतु धैर्यशील मोहिते पाटील हे विरोधी खासदार असल्यामुळे त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले की काय असेच वाटते.

.    आता शासन याच उजनी धरणाच्या मध्ये डेटा सेंटर उभे करण्याचे नियोजन बाकी आहे या डेटा सेंटरला अन्य राज्यातून व जगभरातून विरोध झालेला असताना देखील आपल्या या उजनी धरणामध्ये हा डेटा सेंटर का उभा करण्यात येणार आहे?. असा संतप्त सवाल सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.

.       या डेटा सेंटर उभारणीसाठी काही स्वार्थी उद्योगपती व राजकीय नेते मंडळी सक्रिय झालीत की काय अशी शंका व्यक्त होऊ लागलेली आहे . महाराष्ट्रातील युवकांच्या हाताला काम मिळेल असे सांगितले जात आहे . या डेटा सेंटरच्या यंत्रणेला मोठ्या प्रमाणामध्ये थंडावा आवश्यक असतो पाण्याची मुबलकता आवश्यक असते हे जरी खरे असले तरी आपल्या या सोलापूर जिल्ह्याची संजीवनी म्हणून ओळखले जाणारे हे उजनी धरण आज गाळयुक्त धरण झालेले आहे असे असताना देखील या उजनी धरणामध्ये असलेल्या तीस ते पस्तीस टक्के पाण्यावर हे डेटा सेंटर उभा केले जाणार की काय असा ही प्रश्न उभा राहतो. दररोज 20 लाख लिटर पाणी या डेटा सेंटरसाठी खर्ची पडणार आहे. हे जर खरे असेल तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधव व सर्वसामान्य जनता पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीच्या पाण्यासाठी त्यांना वणवण फिरावे लागणार आहे. याची कल्पना शासनकर्त्यांना व उच्च अधिकाऱ्यांना नाही की काय? 

.   मोठ्या प्रमाणामध्ये उजनी धरणामध्ये गाळ साचलेला असताना तो गाळ न काढता हा डेटा सेंटर उभा करण्याचे प्रयोजन काय?. या उजनी धरणातील गाळ काढल्यास या उजनी धरणात जे काही पाणी साचणार आहे, थांबणार आहे त्या पाण्याचा विनियोग ऊर्जा निर्मिती तसेच शेतकरी बांधव आणि त्या उजनी धरणावर अवलंबून असलेले असंख्य तालुके यांची तहान भागणार आहे. या सर्व गोष्टी माहीत असून देखील या उजनी धरणातील गाळ काढला जात नाही. या धरणातील गाळ काढल्यास मोठ्या प्रमाणामध्ये उजनी धरणामध्ये पाणी साचणार आहे व त्या पाण्याचा उपयोग आजूबाजूच्या देखील होणार आहे याची कल्पना शासनाला नसावी असे थोडेच आहे.

.    उजनी धरणाच्या पाण्यावर सोलापूर जिल्हा व अन्य तालुका व शेतकरी बांधव व जनता अवलंबून आहे या सर्वांना विचारात घेऊनच शासनाने निर्णय घ्यावा. काही स्वार्थी नेतेमंडळी व उद्योगपती यांच्या दबावाला न जुमानता सर्व जनतेने व शेतकरी बांधवांनी विरोध दर्शवायला हवा अशी चर्चा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीला होत आहे.

.   संपूर्ण जगभरातून अशा या डाटा सेंटरला विरोध होत असताना देखील आपल्या देशामध्ये हा उपक्रम का राबविला जात आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या उजनी सारख्या शेतकरी व जनतेला संजीवनी ठरलेल्या या उजनी धरणावर डेटा सेंटर का उभारला जात आहे उजनी धरणाच्या गाळामध्ये डेटा सेंटर उभा राहणार का असा संतप्त सवाल सर्वसामान्य जनता व शेतकरी बांधव विचारत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

" निवडणूक पूर्वी डॉ. बीपी रोंगे यांच्या प्रचाराची फेरी पूर्ण "...... . अन्य उमेदवार अद्यापही निष्क्रिय....

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"